Jalgaon News : पाचोरा येथे मोकाट जनावरांचा उपद्रव; वाहतुकीला अडथळा, अपघातांत वाढ

Animals sitting on busy streets in Bhadgaon Road area.
Animals sitting on busy streets in Bhadgaon Road area. esakal
Updated on

Jalgaon News : शहरातील प्रमुख रस्ते व चौकात तसेच शहरालगतच्या वसाहतीत मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला असून, शाळकरी मुले व वृद्ध यांच्यात कमालीची भीती पसरली आहे. पालिका व वन विभागाने ही बाब गांभीर्याने घेऊन मोकाट प्राण्यांचा बंदोबस्त करावा.

संबंधित प्राण्यांच्या मालकांवर दंड आकारण्याची मागणी त्रस्त नागरिकांतर्फे केली जात आहे. (increase in nuisance of stray animals in suburbs of city jalgaon news)

शहरातील भडगाव रोड, शहरालगतचा राष्ट्रीय महामार्ग, बसस्थानक रस्ता, मानसिंगका मील रस्ता, जामनेर रोड, कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील रस्ता, रिंग रोड या प्रमुख ठिकाणी मोकाट गुरांचा मोठ्या संख्येने वावर वाढला आहे. ही जनावरे तासनतास रस्त्याच्या मधोमध बसून असतात.

रस्त्याने ये-जा करणाऱ्यांच्या अंगावर धावून जाणे, हातातील पिशव्या ओढणे, अचानक पळत सुटणे, अथवा आपसात मारामारी करणे, असे प्रकार वाढत असल्याने नागरिकांमध्ये कमालीची भीती पसरली आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात असलेल्या वसाहतींमध्ये वानर मोठ्या संख्येने येऊन नुकसान करतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Animals sitting on busy streets in Bhadgaon Road area.
Jalgaon Crime News : भडगावात वाळूचोरांवर पोलिस पथकाची कारवाई; 83 लाखांचा मुद्देमाल जप्त

घाणीचे साम्राज्य शहराच्या विविध भागात असल्याने मोकाट कुत्रे व डुक्कर यांचीही संख्या वाढून त्यांचा उपद्रव वाढला आहे. मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला अडथळा तसेच अपघात होत असल्याने वाहनधारकांमधील भीती वाढली आहे. शाळकरी मुलांचे पालक यामुळे चिंताग्रस्त झाले असून, वृद्ध महिला व पुरूषांना रस्त्यावर येण्याची भीती वाढली आहे.

मोकाट गाई, गोऱ्हे, कुत्रे, डुक्कर शहरालगतच्या वसाहतीत हैदोस घालून मोठे नुकसान करीत असल्याने महिलांमधील भीती वाढीस लागली आहे. पालिका व वन विभागाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घ्यावी व मोकाट जनावरे मानवी जीवितहानीस कारणीभूत होण्याअगोदर त्यांच्या योग्य तो बंदोबस्त करावा.

मोकाट जनावरे रस्त्यावर सोडणाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्यावर जाचक दंडाची आकारणी करावी, अशी मागणी त्रस्त नागरिकांच्या वतीने केली जात आहे. अन्यथा या मोकाट प्राण्यांमुळे कोणाचा जीव गेल्यास संबंधित यंत्रणा जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा त्रस्त नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे.

Animals sitting on busy streets in Bhadgaon Road area.
Jalgaon News : गौणखनिजाअभावी विकासकामे ठप्प; कजगावकर आंदोलनाच्या पवित्र्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.