Diwali 2023: दिवाळीच्या तोंडावर सुका मेव्याने खाल्ला भाव; नागरिकांच्या खिशाला कात्री

Increase in price of dry fruits by 100 to 200 per kg jalgaon news
Increase in price of dry fruits by 100 to 200 per kg jalgaon news
Updated on

Diwali 2023 : दिवाळीत घरोघरी तयार केल्या जाणाऱ्या फराळाबरोबर मिठाईमध्ये प्रामुख्याने सुका मेवा वापरला जातो. मात्र, सुक्या मेव्यातील पिस्ता, खारीकच्या दरात प्रतिकिलो मागे १०० ते २०० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा आप्तेष्ट, शासकीय तसेच खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना भेट म्हणून देण्यात येणाऱ्या सुक्या मेव्यासाठी ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

दिवाळीत नातेवाईक, आप्तेष्टांना भेटवस्तू देण्यासाठी काजू, बदाम, अंजीर इत्यादींनी भरलेल्या आकर्षक बॉक्समध्ये मिळालेला सुका मेवा अनेक जण घेतात. (Increase in price of dry fruits by 100 to 200 per kg jalgaon news)

मात्र, यंदा सुका मेवा बाजारात चांगलाच भाव खाणार आहे. कारण सुक्या मेव्यातील बदाम, काजूचे दर जरी स्थिर असले तरी पिस्ता, खारीकचे दर प्रतिकिलो १०० ते २०० रुपयांनी वाढल्याने नागरिकांना यासाठी आता अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहे.

दिवाळीत भेट देण्यासाठीचा पर्याय

सध्या कार्यालय व कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना सुका मेवा भेट देण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. दिवाळीपूर्वी सुक्या मेव्याच्या गिफ्ट पॅकेटची मागणी वाढू लागली आहे. दिवाळीत आरोग्याची काळजी घेत मिठाईपेक्षा सुक्या मेव्याला नागरिकांकडून अधिक पसंती दिली जाते.

बाजार सजला

अवघ्या काही दिवसांवर आलेल्या दिवाळी सणामुळे बाजारपेठे विविध वस्तूंनी सजली सजली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यापारी वर्गाने चांगली तयारी केली आहे.

Increase in price of dry fruits by 100 to 200 per kg jalgaon news
Diwali 2023 : दिवाळीच्या पूजेसाठी आणा मातेची अशीच मूर्ती, वर्षभर तिजोरी भरलेली राहील!

प्रकार आधीचे दर वाढलेले दर

काजू ६५० ते ८०० ७०० ते १२००

बदाम ७०० ते १००० ९०० ते १२००

पिस्ता ८०० ते १४०० ९५०० ते १८००

अक्रोड ७०० ते १३०० ८०० ते १५००

खारीक १३० ते ३५० १४० ते ४५०

खजूर ९० ते १२० १०० ते १८०

मनुका ९० ते १६० १०० ते २५०

"सुवा मेवाच्या दरात यावर्षी किलोमागे १०० ते २०० रुपयांची वाढ झाली आहे. काजू आणि बदामाचे भाव स्थिर आहे." - सुकचंद पटेल, व्यापारी

Increase in price of dry fruits by 100 to 200 per kg jalgaon news
Fake Dry Fruits : खरे की बनावटी, तुम्ही कोणते ड्राय फ्रूट्स विकत घेताय हे कसं कळेल? इथे वाचा ट्रिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()