Indian Railway : गेल्या वर्षात रेल्वे विभाग मालामाल! मिळवला तब्बल 'इतक्या' कोटींचा महसूल

Indian Railways
Indian Railways esakal
Updated on

जळगाव : भुसावळ रेल्वे विभागाच्या वाणिज्य शाखेने डिसेंबर २०२२ मध्ये एकूण १२८ कोटी एक हजारांचा महसूल मिळाला आहे. हा महसूल २०२१ वर्षीच्या ११० कोटी ५३ लाखांपेक्षा १६ टक्के जास्त आहे.

Indian Railways
Indian Railway : रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई; विनातिकीट प्रवाशांकडून 23 लाखांचा दंड वसूल

मेल एक्स्प्रेस, पॅसेंजर ट्रेनमधील तिकीट विक्रीतून ६२ कोटी ९३ लाखांचे उत्पन्न मिळविले. जे २०२१ वर्षीच्या डिसेंबरच्या ४३.२१ कोटींपेक्षा ४६ टक्के अधिक आहे. मालगाडीतून पाठविलेल्या पार्सल, पदार्थ, सिमेंट, तेल, कोळसा, डिझेल, पेट्रोल आदी वस्तूंमधून ५६ कोटी ६६ लाख मिळविले.

जे डिसेंबर २०२१ मध्ये मिळविलेल्या ५१ कोटी ५४ लाखांपेक्षा दहा टक्के जास्त आहे. पार्किंगच्या ठेक्यातून ३६ लाखांचे उत्पन्न मिळविले. नॉन फेअर कमाईमध्ये ५९ लाखांचे उत्पन्न मिळविले. जे डिसेंबर २०२१ च्या २३ लाखांपेक्षा ७० टक्के जास्त आहे. खानपान विभागातून एक कोटी १८ लाखांचे उत्पन्न मिळाले.

हेही वाचा: जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

भुसावळ वाणिज्य विभागातर्फे डिसेंबरमध्ये विभागाचा महसूल वाढविण्यासाठी तीन प्रकारची चेकिंग मोहीम राबविण्यात आली. १७ डिसेंबरला मेगा तिकीट चेकिंग मोहीम राबविली. त्यात वाणिज्य निरीक्षक, तिकीट निरीक्षक, आरपीएफ स्टाफ यांच्या सहाय्याने २३ लाख २७ हजारांचा महसूल मिळविला. तीन हजार ९१५ केसेसमध्ये हा महसूल मिळाला.

२७ डिसेंबरला यूटीएस ॲपच्या प्रमोशनसाठी २५ मुख्य रेल्वेस्थानकांवर व तीन मेमू गाडीत मोहीम राबविण्यात आली. यात आठ हजार २२० प्रवाशांना महत्त्व सांगून एक हजार ९७२ जणांकडून ॲप डाउनलोड करून घेतले.

३० डिसेंबरला खानपान, पार्किंग, वाणिज्य प्रसारमाध्यम, सफाई, पार्सल आणि पे ॲन्ड यूज यांच्यात अनियमितता आळल्याने २११ केसेस करून दहा लाख ४९ हजारांचा महसूल गोळा करण्यात आला.

Indian Railways
Indian Railway New Decision : आता घरबसल्या करता येईल ही गोष्ट, रेल्वेकडून मोठा बदल

डिसेंबर २०२२ मध्ये ३२ ऑटोमोबाईल रेक लोड केले. त्याद्वारे चार कोटी ५१ लाखांची कमाई केली आहे. जी डिसेंबर २०२२ मध्ये लोड करण्यात आलेली सर्वांत चांगली आहे. यापूर्वीचे सर्वोत्तम ३० रेक होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.