Jalgaon News : जिल्ह्यात 23 हजार 936 जनावरांची वंध्यत्व तपासणी

गाय व म्हैसवर्गीय जनावरांमध्ये शंभर टक्के प्रजनन क्षमता व्हावी, त्यांचे वंध्यत्व कमी व्हावे.
Jalgaon Animal Husbandry Department officials inspecting the animals
Jalgaon Animal Husbandry Department officials inspecting the animalsesakal
Updated on

Jalgaon News : गाय व म्हैसवर्गीय जनावरांमध्ये शंभर टक्के प्रजनन क्षमता व्हावी, त्यांचे वंध्यत्व कमी व्हावे. यासाठी जिल्ह्याच्या पशुसंवर्धन विभागामार्फत १ हजार ३६९ शिबिराच्या माध्यमातून २३ हजार ९३६ जनावरांची वंध्यत्व तपासणी करण्यात आली.

अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.श्यामकांत पाटील यांनी दिली. (Infertility check of 23 thousand 936 animals in district Jalgaon News)

जिल्ह्यात १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत विशेष मोहीम घेत वंध्यत्व निवारण अभियान राबविण्यात आले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार हे अभियान राबविण्यात आले. या अभियानात जिल्ह्यात वंध्यत्वाने बाधित दुभती जनावरे यांची तपासणी करून त्यांच्या उपचार शिबिर झाले.

देशपातळीवर महाराष्ट्राचा दूध उत्पादनात सहावा क्रमांक असून २०१९ च्या २९ व्या पशुगणनेनुसार जिल्ह्यात ८ लाख ५० हजार गाय व म्हैस वर्ग पशुधन आहेत, यातील ३५ हजार ८२५० गाय व म्हैस वर्गीय जनावरे प्रजननक्षम आहेत.

या अभियानातील शिबिरात गाई म्हशींच्या प्रजनन माजाचे चक्र, माज लक्षणे, म्हशी मधील मुका माज, कृत्रिम रेतन गर्भ तपासणी, वंध्यत्व निवारण, वैरण विकास कार्यक्रम, पशु यांचे आरोग्य तपासणी करण्यात आली.

अहमदनगर जिल्ह्याने १६०१ वंध्यत्व शिबिरांमध्ये १८९४२ जनावरांची तपासणी केली. तर जळगाव जिल्ह्याने १३६९ शिबिरात २३९३६ जनावरांची तपासणी केली. अहमदनगरच्या तुलनेने कमी मनुष्यबळ असतानाही जळगाव जिल्ह्याने अहमदनगर जिल्ह्यापेक्षा जास्त तपासणी केल्या आहेत.

Jalgaon Animal Husbandry Department officials inspecting the animals
Jalgaon News : ‘बांडी’ची यंदा उडाली दांडी, 100 रुपयांत तिनशेच कांडी

जिल्ह्यात वंध्यत्वाचा त्रास असणारे २३ हजार ९३६ जनावरांवर वंध्यत्व तपासणी करण्यात आली. २१ हजार ४३९ जनावरांवर वंध्यत्व निवारणासाठी उपचार करण्यात आलेले आहे.

जिल्ह्यात असणाऱ्या १८२ पशू उपचार करणाऱ्या संस्थांमध्ये पशुसंवर्धन उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, पशुधन विकास अधिकारी, सहायक पशुधन पर्यवेक्षक, पशुधन पर्यवेक्षक आणि खासगी पशुधन पर्यवेक्षक यांनी शिबिरात जनावरांवर उपचार केले आहेत.

"जी जनावरे उपचार व तपासलेले आहे त्यांना माज आल्यावर शासकीय पशुवैद्यकीय संस्थांशी संपर्क करून कृत्रिम रेतन करून घ्यावे."- डॉ.श्यामकांत पाटील (पशुसंवर्धन उपायुक्त )

Jalgaon Animal Husbandry Department officials inspecting the animals
Jalgaon News : अनधिकृत भोंगे हटवा अन्यथा हनुमान चालिसा लावणार; 5 दिवसांचा अल्टिमेटम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.