Jalgaon Innovation Story : गुरू-शिष्येच्या सायबर सुरक्षा संशोधनाला पेटंट

Innovation Story of Teacher And Student
Innovation Story of Teacher And Studentesakal
Updated on

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्राध्यापक व त्यांच्या विद्यार्थिनीस सायबर सुरक्षेसंदर्भात सुरक्षित विसंगतीवर आधारित कार्यक्षम प्रत्यक्ष वितरित घुसखोरी शोधप्रणालीसाठी (SABER-DIDS) विकसित केलेल्या संशोधनासाठी भारत सरकारचे पेटंट मिळाले आहे.

संगणकशास्त्र प्रशाळेचे संचालक व वरिष्ठ प्राध्यापक डॉ. सतीश कोल्हे व त्यांच्या विद्यार्थिनी डॉ. शर्मिला किशोर वाघ, असे पेटंट मिळविणाऱ्या गुरू-शिष्याचे नाव आहे. (Innovation Story Teacher Disciple Cyber ​​Security Research Patented Approve Jalgaon News)

Innovation Story of Teacher And Student
Jalgaon : गीता धर्मग्रंथ नव्हे, मानवी जीवनाचे नियमन करणारा ग्रंथ

...अशी आहे यंत्रणा

इंद्रुजन डिटेक्शन सिस्टम (आयडीएस) ही एक अशी प्रणाली आहे. जी संशयास्पद क्रियाकलापांसाठी नेटवर्क रहदारीचे निरीक्षण करते आणि जेव्हा अशी क्रियाकलाप आढळली तेव्हा सूचना जारी करते. हे एक सॉफ्टवेअर आहे. जे हानिकारक क्रियाकलाप किंवा धोरण उल्लंघनासाठी नेटवर्क किंवा सिस्टम स्कॅन करतो आणि ती माहिती सामान्यतः प्रशासकाला कळविली जाते किंवा सुरक्षा माहिती आणि कार्यक्रम व्यवस्थापनप्रणाली वापरून केंद्रस्थानी गोळा केले जाते. ही सिस्टीम एकाधिक स्त्रोतांकडून आउटपूट करते आणि खोट्या अलार्मपासून क्रियाकलाप वेगळे करण्यासाठी अलार्म फिल्टरिंग तंत्र वापरते.

सायबर सुरक्षेसाठी महत्त्वाचे

सायबर सुरक्षेसंदर्भातील टेक्नॉलॉजीतील हे महत्त्वाचे संशोधन असून, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात फार उपयोगाचे ठरणार आहे. एकप्रकारे ते वरदान असणार असून, या संशोधनामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व संगणकशास्त्र प्रशाळेच्या गौरवात भर पडली आहे. याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी व प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांनी प्रा. डॉ. सतीश कोल्हे व त्यांच्या संशोधक चमूचे अभिनंदन केले आहे.

Innovation Story of Teacher And Student
Jalgaon : नगररचनाच्या अभियंत्याने बांधकाम मंजुरीसाठी घेतले अडीच लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.