Jalgaon News : सातारा स्थित ग्रीन फिल्ड ॲग्रीकेम कंपनीकडून वितरित झालेल्या संशयित १८:१८:१० मिश्र खतांच्या विक्री प्रकरणी खानदेशातील १९ कृषिसेवा केंद्रांची तपासणी करण्यात येत आहे.
यात जळगाव जिल्ह्यातील चार कृषिसेवा केंद्रांची तपासणी करून त्यांचा खत विक्री परवाना रद्द करण्यासंबंधी नाशिक विभागीय कृषी सहसंचालक यांनी आदेश पारित केले आहेत. (Inspection of 4 centers in case of sale of mixed fertilizers jalgaon news)
जळगावसह धुळे व नंदुरबार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांसंबंधी सूचना करण्यात आल्या आहेत. त्यात धुळे जिल्ह्यातील १३, तर नंदुरबार जिल्ह्यातील दोन खत विक्रेत्यांचा समावेश आहे.
ग्रीन फिल्ड ॲग्रीकेम प्रा. लि. या कंपनीकडून धुळे येथील कंपनीचे मुख्य वितरक भूमी क्रॉप सायन्स यांच्या माध्यमातून खानदेशातील विविध १९ कृषिसेवा केंद्रांना या कंपनीचे संशयित १८:१८:१० मिश्र खतपुरवठा करण्यात आला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. खानदेशातील १९ केंद्रांची यादी नाशिक येथील विभागीय कृषी सहसंचालक यांनी जारी केली असून, त्यांच्या तपासणीचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
यात जळगाव जिल्ह्यातील लीलाधर चौधरी (ता. धरणगाव, नांदेड), चौधरी कृषी सेवा केंद्र (कळमसरा, ता. अमळनेर), फलक कृषी सेवा केंद्र (अमळनेर), धीरज कृषी सेवा केंद्र (अमळनेर) या चार केंद्रांची त्या-त्या तालुक्याच्या पंचायत समिती कृषी अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांच्याकडील खतांचा साठा जप्त करावा व खत विक्री परवाना रद्द करावा, असे आदेश देण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.