Jalgaon Rain Damage : तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावत बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडल्याने दुबार पेरणीचे संकट टळले असले तरी कुर्हा हरदो, शेवगा व धोंडखेडा येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना जोरदार फटका बसला आहे. (Inspection of damage in Bodwad taluka by MLA Chandrakant Patil jalgaon news)
पावसाचा जोर जास्त असल्याने शेतातील माती वाहून गेली आहे. यात गावातील घरांचे नुकसान झालेले आहेत. पिके मोठ्या प्रमाणात वाहून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पावसाच्या आगमनाची आतुरता शेतकऱ्यांना लागलेली होती. तालुक्यातील बहुतांश भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल्याने दुबार पेरणीचे संकट टळले असले तरी कुर्हा हरदो, शेवगा व धोंडखेडा येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
उजनी जंगल परिसरात बऱ्याच शेतकऱ्यांच्या कपाशीचे जंगली प्राण्यांनी नुकसान केले आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या आनंदावर चिंतेचा भार पडलेला आहे.
या वेळी शेतकरी, ग्रामस्थांच्या उपस्थितीत आमदार चंद्रकांत पाटिल यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत शेतीच्या व घरांच्या नुकसानीबाबत पंचनामे करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देऊन लवकर नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवावा अशा सूचना केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.