Jalgaon Agriculture News : विषाणूजन्य केळीबागांची शास्त्रज्ञांकडून पाहणी; केळीवर ‘सीएमव्ही’चा प्रसार

Inspection of virus infected banana orchards by scientists jalgaon news
Inspection of virus infected banana orchards by scientists jalgaon newsesakal
Updated on

Jalgaon Agriculture News : तालुक्यातील १० विविध गावांत केळीवरील सीएमव्ही (कुकुंबर मोझाक व्हायरस) या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर कृषी विज्ञान केंद्र, पाल व कृषी विभाग, रावेरमार्फत बुधवारी (ता. १३) पाहणी करण्यात आली.

केऱ्हाळे, अहिरवाडी पट्ट्यात असंख्य शेतकऱ्यांनी सुमारे १ लाख केळीची रोगग्रस्त खोडे उपटून टाकल्याने त्यांचे सुमारे ५० ते ६० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

तालुक्यातील निरुळ, पाडळा, अहिरवाडी, पिंप्री, मोहगण, केऱ्हाळा, विवरे, अभोडा, रसलपूर, कुंभारखेडा, उतखेडा व चिनावल या गावांमध्ये सीएमव्हीचा फैलाव आधिक प्रमाणावर झाला असल्याचे सांगण्यात आले. (Inspection of virus infected banana orchards by scientists jalgaon news)

क्षेत्र भेटीच्या माध्यमातून सीएमव्ही रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या केळी लागवड क्षेत्रावर पाहणी करण्यात आली व रोग नियंत्रणाविषयी तांत्रिक माहिती देण्यात आली. प्रा. महेश महाजन, डॉ. डी. एस. नेहेते (शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, पाल), तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके, मंडळ कृषी अधिकारी श्री. इंगळे, कृषी पर्यवेक्षक सचिन गायकवाड, के. जी. काळे उपस्थित होते.

अहिरवाडी, केऱ्हाळेत मोठे नुकसान

तालुक्यातील अहिरवाडी, केऱ्हाळे पट्ट्यात सीएमव्हीमुळे मोठे नुकसान झाले आहे. केऱ्हाळे येथील डॉ. संजय पाटील - ११ हजार, मधुकर पाटील ११ हजार, विजय महाजन - ७ हजार, अशोक पाटील, मनोहर पाटील, राहुल पाटील, संतोष पाटील यांचे प्रत्येकी ३ हजार तसेच अहिरवाडी येथील सुशांत चौधरी - १२ हजार, सचिन पाटील - ८ हजार, राहुल चौधरी - ४ हजार, मोहगण येथील डिगंबर चौधरी यांच्या ३ हजार केळी खोडांना सीएमव्ही रोगाची लागण झाली असून, या शेतकऱ्यांनी ही रोगग्रस्त खोडे उपटून नष्ट करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे एकूण किमान ५० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

पाच हजार हेक्टर्सवर केळी प्रभावित

‘सकाळ’ने याबाबत विविध गावांतील केळी उत्पादक शेतकरी व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता ‘सीएमव्ही’मुळे होणारे संभाव्य नुकसान ५ हजार हेक्टर्सपेक्षा जास्त असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Inspection of virus infected banana orchards by scientists jalgaon news
Jalgaon Agriculture News : जिल्ह्यात खतांचा 1 लाख 22 हजार मेट्रिक टन साठा उपलब्ध

येत्या आठवड्यात हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. जून, जुलै, ऑगस्टमध्ये लागवड केलेल्या केळीवर हा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. शेतकऱ्यांनी मशागत, टिश्यू कल्चर रोपे, खते, सिंचन, मजुरी यावर प्रती खोड ५० ते ५५ रुपये खर्च केला आहे.

"पाहणी केलेल्या १० गावांतील ३० ते ३५ केळी बागांमध्ये ४० - ५० टक्के केळी खोडे ‘सीएमव्ही’ने प्रभावित आहेत. रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत." - महेश महाजन, शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, पाल (ता. रावेर)

पंचनामे केव्हा?

तालुका कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्र, पाल यांच्या संयुक्त पाहणीचा अहवाल लवकरच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश निघणे अपेक्षित आहे.

शेतकरी आपल्या केळी बागेतील रोगग्रस्त केळी खोडे उपटून फेकत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने पंचनाम्याचे आदेश द्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Inspection of virus infected banana orchards by scientists jalgaon news
Jalgaon Agriculture News : केळीवर ‘सीएमव्ही’ रोगाचा प्रादुर्भाव; रावेर तालुक्यात सुमारे 500 हेक्टर्सवर बाधा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.