Jalgaon Dengue Disease : ‘डेंग्यू’वर नियंत्रणासाठी शर्थीचे प्रयत्न करा; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचना

dengue
dengueesakal
Updated on

Jalgaon Dengue Disease : जिल्ह्यात डेंग्यूच्या साथीचा प्रादुर्भाव वाढला असून, त्यावर तत्काळ नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य प्रशासनाने फिल्डवर जात शर्थीचे प्रयत्न करावेत‌. अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या.

जिल्ह्यातील डेंग्यू साथीच्या प्रादुर्भावाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. ९) बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. ‌

(Instructions of Collector Ayush Prasad to Make concerted effort to control dengue jalgaon news)

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, पालिका प्रशासन सहायक आयुक्त जनार्दन पवार, शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे वैद्यकिय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड आदी या वेळी उपस्थित होते.

डेंग्यूबाधित रुग्ण संख्येबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी चिंता व्यक्त केली आहे. आरोग्य यंत्रणेने नियोजन करून डेंग्यूचे रुग्ण कमी करण्याचे निर्देश ग्रामविकास मंत्री गिरिष महाजन यांनी दिले आहेत. डेंग्यूमुळे बाधीत रुग्णांच्या उपचाराकडे लक्ष देण्याच्या सूचना आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिल्या आहेत.

असे नमूद करून जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले की, घराच्या परिसरात पाणी साचू देऊ नका, डबक्याच्या स्वरुपात जमा झालेले पाणी प्रवाहीत करावे, अथवा त्यावर माती टाकून खड्डे बुजविण्यात यावेत, ही कार्यवाही ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिकेद्वारे करण्यात यावी. कायमस्वरुपी पाण्याचा स्त्रोत असलेली परंतू जिथे स्वच्छ पाणी साचून आहे, अशा ठिकाणी (नदी, नाले, तलाव, विहीरी) प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे गप्पी मासे सोडण्यात यावीत.

dengue
Nashik Dengue Disease : शहरात डेंगीचा उद्रेक; सप्टेंबर महिन्यात 840 संशयित रुग्ण

आशा कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षण करावे. डास उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करावीत. परिसरात डास निर्मूलनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका यांच्याद्वारे फवारणी करण्यात यावी. फवारणी करताना खाद्यपदार्थांवर होणार नाही याचीही काळजी घ्यावी. लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. नागरिकांनी मच्छरदाणीचा वापर करावा.

शक्य झाल्यास घराबाहेर पडताना पूर्ण अंगभर कपडे वापरल्यास डासांमूळे होणारे आजार होण्याचे प्रमाण कमी होईल. भरपूर पाणी प्यावे. अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी या वेळी दिल्या. सूचनांचे पालन न झाल्यास दोषींविरुद्ध कारवाई करावी, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, डेंग्यू साथीचा प्रसार झाल्याचे अतिजोखमीचे २० ठिकाणे तपासणीत निष्पन्न झाले असून, या ठिकाणी नागरिकांनी अतिदक्षता बाळगण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

dengue
World Malaria Day 2024 : मलेरिया आणि डेंगूमध्ये नेमका फरक काय ? जाणून घ्या दोन्हींची लक्षणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.