Jalgaon News : प्रदूषण नियंत्रण अंमलबजावणीसाठी विशेष पथके; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Maharashtra Pollution Control Board
Maharashtra Pollution Control Boardesakal
Updated on

Jalgaon News : प्रदूषण नियंत्रणासाठी मुख्यमंत्र्यांच्या सूचनांनंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक सुधारण्यासाठीच्या उपाययोजना राबविण्याचे आवाहन केले‌ आहे.

या सूचनांच्या अंमलबजावणीसाठी विशेष पथके नियुक्त करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.(Instructions of Collector Pollution Control Special teams for enforcement in jalgaon news )

जिल्ह्यातील बांधकाम स्थळे धुळमुक्त आणि स्वच्छ करावीत. अण्टी स्मॉग गन, स्प्रिंकलर्सचा वापर वाढवावा. जळगाव शहर व जिल्ह्यातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस, महापालिका आयुक्त व जिल्ह्यातील विविध यंत्रणांनी एकत्रितपणे कार्यवाही करावी. नागरिकांना प्रदूषण रोखण्याच्या मोहिमेमध्ये सहभागी करून लोकचळवळ निर्माण झाली पाहिजे.

या दिल्या सूचना

बांधकामे, विकास प्रकल्पांची कामे यामुळे धुळीचे साम्राज्य पसरू नये म्हणून पाण्याची फवारणी करून रस्ते स्वच्छ करावीत त्याचबरोबर साचलेली धुळे साफ करण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करावी. बांधकाम ठिकाणांवर धुळ रोखण्यासाठी पत्रे लावतानाच ही सर्व ठिकाण धुळमुक्त करण्यात यावेत.

कामांच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या पत्र्यांमुळे रस्त्यांवरून जाताना नागरिकांना त्रास होणार नाही याचीही दक्षता घ्यावी. वाहनांमधून रस्त्यांवरील माती, डेब्रीज वाहून नेताना ती झाकून वाहतूक करावी तसे न करणाऱ्या वाहनांवर वाहतूक विभागाने कारवाई करण्याच्या सूचना प्रसाद यांनी दिल्या आहेत.

Maharashtra Pollution Control Board
Jalgaon News : रमाई आवासच्या 1845 घरकुलांना; पालकमंत्र्यांकडून प्रशासकीय मंजुरी

मोकळ्या जागेमध्ये पालापाचोळा किंवा घरगुती घनकचरा जाळण्यास निर्बंध असतील. महानगरपालिका/नगरपरिषद क्षेत्रातील सर्व रस्त्यांना पक्के फुटपाथ करावेत. बेकरीमध्ये वापरात जीवाश्म प्रदूषणकारी इंधनाच्या ऐवजी स्वच्छ पर्यायी इंधन, इतर पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी दिशानिर्देश जारी करावेत.

विद्युत किंवा इतर पर्यावरणास अनुकूल इंधनाचा वापर करून, स्मशानभूमीच्या अंत्यसंस्काराच्या सुविधा रुपांतरीत करण्यासाठी संबंधित आस्थापनेने सक्रिय पावले उचलावीत.

.. तर कारवाई होणार

रात्री उशिरा बांधकाम आणि विध्वंस कचरा / मलबाची अवैध डंपिंग रोखण्यासाठी विशेष पथके काम करणार आहेत. पथकाने संबंधित परिसराला भेट देऊन, कार्यस्थळाची चित्रफीत (व्हिडिओ ग्राफ) काढावी व सदर अंमलबजावणी करीत असताना तरतुदींचे पालन न झाल्याचे निदर्शनास आल्यास, बांधकाम कार्यस्थळ यांच्यावर बांधकाम थांबविण्याच्या नोटीस / कार्यस्थळ सील करणे यासारखी कठोर कारवाई तत्काळ करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.