Jalgaon News : निसर्गातील महत्त्वाचा घटक आणि परागीभवन प्रक्रियेत निर्णायक भूमिका निभावणाऱ्या ‘पाखरांबाबत’व्यापक स्वरूपात जनजागृती कार्य झाले पाहिजे, या उद्देशाने ‘बीबीएम’ अर्थात ‘बिग बटरफ्लाय मंथ’ या कार्यक्रमाची संकल्पना पुढे आली. गेल्या पाच वर्षांपासून ही मोहीम सुरू आहे.
या मोहिमेत खानदेशातून वन्यजीव संरक्षण संस्थेचा सक्रिय सहभाग असून, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यात वन्यजीव संरक्षण संस्था बीबीएमची सहकारी संस्था म्हणून कार्य करते. (Involvement of Wildlife Conservation Society in Big Butterfly Month campaign jalgaon news)
फुलपाखरांची सद्यःस्थिती, त्यांचे संरक्षण, त्यांच्या रहिवासी अधिवासाचे संवर्धन व्हावे म्हणून फुलपाखरांसाठी कार्य करणाऱ्या भारतभरातील व्यक्ती आणि संस्थां यांना एकाच व्यासपीठावर जास्तीत जास्त संख्येने एकत्र आणून काही प्रयत्न केले गेले पाहिजे, हा उद्देश समोर ठेवून जळगाव जिल्ह्यात फुलपाखरू अभ्यासक राहुल सोनवणे, बाळकृष्ण देवरे, अमन गुजर, प्रसाद सोनवणे, नंदुरबार जिल्ह्यात सागर निकुंभे जिल्हा प्रतिनिधी म्हणून मार्गदर्शन करतील. त्यांच्या मार्गदर्शनात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे, असे संस्था अध्यक्ष रवींद्र फालक यांनी सांगितले.
सहभागी होणाऱ्या प्रत्येक सदस्याला संस्थेचे फुलपाखरू अभ्यासक सातपुड्यातील फुलपाखरांची भेट घडवून आणत त्यांची शास्त्रीय ओळख, त्यांच्या प्रजननसाठी योग्य वनस्पती, फुलपाखरांचे खाद्य, सवयी याबद्दल माहिती करून देणार आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा समन्वयक राहुल सोनवणे (८९९९५१६५७८),
बाळकृष्ण देवरे (९०२८३ ०८३६५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्था सचिव योगेश गालफाडे यांनी केले आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
असे होतील कार्यक्रम...
शनिवारी (ता. ९) शेती शिवार, रविवारी (ता. १०) हनुमान खोरे येथे, तर वन्यजीव संरक्षण संस्थेतर्फे यावल प्रादेशिक वन विभागाच्या सहकार्याने रविवारी (ता. १७) ‘सातपुडा बिग बटरफ्लाय वॉक’ चे आयोजन करण्यात आले आहे. फुलपाखरू अभ्यासक आणि फुलपाखरांबद्दल आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी हा कार्यक्रम राबविला जात आहे.
"फुलपाखरांना अधिक जवळून जाणून घेण्याचा सप्टेंबर हा महिना ‘बिग बटरफ्लाय मंथ’ म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा करण्यात येत आहे. भारतातील असंख्य फुलपाखरू प्रजाती आय नेचरलिस्टसारख्या संकेतस्थळावर नोंदविल्या जाणार आहेत. जिल्ह्यातील फुलपाखरूप्रेमी या मोहिमेत सामील होऊ शकतात." -बाळकृष्ण देवरे, जिल्हा समन्वयक बी. बी. एम.
"‘बिग बटरफ्लाय मंथ’ हा कार्यक्रम म्हणजे एक मोहीम आहे. फुलपाखरांना सर्वसामान्यांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोचविण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी देशातील ३० पेक्षा जास्त संस्था त्यांचे सदस्य, एकत्र येऊन कार्य करीत आहेत. १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे." - विजय बर्वे, बीबीएम आयोजक, फुलपाखरू अभ्यासक
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.