Irshalwadi Landslide: "इर्शाळवाडीतील मृतांची संख्या तीन आकडी असू शकते"; गिरीश महाजन सांगितला ग्राऊंड रिपोर्ट

रायगडमधील इर्शाळवाडीतील दरड दुर्घटनेत आत्तापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला आहे.
Girish Mahajan
Girish Mahajanesakal
Updated on

जळगाव : रायगडमधील इर्शाळवाडी इथं घडलेल्या भीषण दरड दुर्घटनेत आत्तापर्यंत २६ जणांचे मृतदेह बचाव पथकाच्या हाती आले आहेत. पण ही संख्या तीन आकडी असू शकते, अशी भीती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनं यांनी व्यक्त केली आहे.

या दुर्घटनेची माहिती कळताच सर्वात सुरुवातीपासून महाजन हे घटनास्थळी हजर राहुन सरकारच्यावतीनं बचाव मोहिमेचं नेतृत्व करत होते. त्यामुळं त्यांनी कथन केलेला इथला ग्राऊंड रिपोर्ट थरकाप उडवणारा आहे. (Irshalwadi Landslide Girish Mahajan statement on dead bodies and rescue operation)

Girish Mahajan
Vidarbha Rain Update : यवतमाळपाठोपाठ बुलढाण्यात पावसाचा कहर; 120 नागरिक अडकले

जळगावच्या बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महाजन म्हणाले, या दुर्घटनेची माहिती कळताच पहाटे ३ वाजता आम्ही घटनास्थळी होतो. यावेळी वादळी पाऊस बरसत होता. या हवामानाच्या स्थितीमुळं बचावकार्यात बरेच अडथळे येत होते. पण इथली परिस्थीती भीषण होती. (Marathi Tajya Batmya)

सुरुवातीला आम्ही काही जणांना वाचवलं. आत्तापर्यंत या दुर्घटनेत २२ ते २४ मृतदेह हाती आले आहेत. पण हा संख्या तीन आकडी असू शकते. इर्शाळवाडीत अडीचशे कुटुंब राहत असल्याची माहिती मिळतेय. पण यांपैकी सुमारे सव्वाशे लोकांना आत्तापर्यंत बाहेर काढण्यात यश आलं आहे, असंही महाजन यावेळी म्हणाले. (Latest Marathi News)

Girish Mahajan
Vidarbha Flood News : यवतमाळमधील पुरात 45 जण अडकले! फडणवीसांनी पाठविली मदत; लष्कराचे हेलीकॉप्टर पोचणार

इर्शाळवाडीत २६ मृतदेह हाती

ताज्या माहितीनुसार, इर्शाळवाडीत सध्या २६ मृतदेह हाती आले आहेत. तर अजूनही सुमारे ६० लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच आत्तापर्यंत दीडशेहून अधिक लोकांना वाचवण्यात यश आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.