Jalgaon News : दीपनगर राखेच्या प्रदूषणाचा मुद्दा गाजला; एकनाथ खडसेंकडून पाठपुरावा

Managing Director of Mahanirti Dr. P. MLA Eknath Khadse raising the issue of ash pollution at Anbalgan.
Managing Director of Mahanirti Dr. P. MLA Eknath Khadse raising the issue of ash pollution at Anbalgan. esakal
Updated on

Jalgaon News : तालुक्यातील दीपनगर औष्णिक वीज केंद्रात सोमवारी (ता. २६) झालेल्या आढावा बैठकीत प्रदूषणाचा मुद्दा चांगलाच तापला.

या मुद्द्यावरून माजी मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे यांनी महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांवर प्रश्‍नांची सरबत्ती केली. (issue of pollution was hotly debated in review meeting at Deep Nagar thermal power station jalgaon news)

या बैठकीत खडसे व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेंद्र चौधरी यांनी महानिर्मितीच्या दीपनगर केंद्रामुळे परिसरात होणाऱ्या प्रदूषणामुळे परिसरातील शेती धोक्यात आल्याचे सांगून इतरही प्रश्‍नांकडे लक्ष वेधले. यावर महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन, प्रकल्प संचालक अभय हरणे, पर्यावरण विभागाचे संचालक नितीन वाघ आदींनी हे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.

दीपनगर औष्णिक वीज केंद्रातील प्रदूषणाबाबत अनेक तक्रारी आहेत. या तक्रारींच्या निपटाऱ्यासाठी सोमवारी (ता. २६) आमदार एकनाथ खडसे यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्‍नांसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन यांनी पर्यावरणीय प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.

दीपनगर केंद्रातून मोठ्या प्रमाणात राख हवेत उडत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांची हानी होत आहे. या सोबतच वेल्हाळे ॲश पॉडला जोडणाऱ्या जलवाहिनीला अनेक ठिकाणी व्हॉल्व आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Managing Director of Mahanirti Dr. P. MLA Eknath Khadse raising the issue of ash pollution at Anbalgan.
Devendra Fadnavis : सध्या मालक बदललेला आहे म्हणून मोदींविरोधात....फडणवीसांचा विरोधकांवर शाब्दिक हल्ला

विविध ठिकाणी बेंड अर्थात वळण आहेत. पर्यावरण नियंत्रण मंडळाच्या नियमांना डावलून हे व्हॉल्व ठेवण्यात आल्याने जलवाहिनी चोकअप झाल्यानंतर व्हॉल्व सोडून राख बाहेर काढली जाते.

ही राख परिसरातील नाल्यांमधून तलावात व भोगावती, तापी नदीचे पात्र दूषित करीत असल्याचा मुद्दा एकनाथ खडसे व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेंद्र चौधरी यांनी मांडला. यासोबत दीपनगरातून फ्लाय ॲश अनधिकृत पद्धतीने दिली जाते.

तीन कंपन्यांचा कार्यालयीन पत्ता एकाच ठिकाणी आहे. या कंपन्यांकडून मातोश्री एंटरप्राइजेस ६० रुपये टनने राख खरेदी करून बाजारात ती ३५० रुपये टनने विक्री करते तर दुसरीकडे उद्योजकांना राख मिळत नाही, हा मुद्दा ऐरणीवर आला.

Managing Director of Mahanirti Dr. P. MLA Eknath Khadse raising the issue of ash pollution at Anbalgan.
CM Shinde in Jalgaon : बस, चारचाकी वाहनांनी शहर गजबजले; ग्रामीण भागातील नागरिकांची संख्या अधिक

यावर कारवाई करण्याचे आश्वासन एमडी डॉ. अनबलगन यांनी दिले. तसेच प्रदूषणाचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी आश्वासन दिले. या वेळी जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे - खेवलकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेंद्र चौधरी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, वेल्हाळेचे योगेश पाटील, डेबा पाटील, तळवेलचे रवी पाटील आदींसह प्रदूषणाने बाधित गावांतील नागरिक उपस्थित होते.

फुलगावचा पाणीप्रश्न सुटणार

दीपनगर प्रदूषणाने बाधित असलेल्या फुलगाव येथे महानिर्मितीने सीएसआरमधून पाणीपुरवठा योजना राबवावी, अशी मागणी २०१८ मध्ये राजेंद्र चौधरी यांनी केली होती. मात्र अद्यापपर्यंत उपाययोजना झाली नाही. या प्रश्नी माजी मंत्री खडसे यांनी लक्ष वेधले. यावर महानिर्मितीचे एमडी डॉ. अनबलगन यांनी हा प्रश्न आगामी काळात तातडीने सोडवला जाईल, असे आश्वासन दिले.

Managing Director of Mahanirti Dr. P. MLA Eknath Khadse raising the issue of ash pollution at Anbalgan.
CM Shinde Jalgaon Daura : अमळनेरला एसटी बससेवा कोलमडली; विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे हाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.