Jalgaon News : कोळी बंधूंची कला सातासमुद्रापार! संसार गाड्याला छंदाचा आधार

Jalgaon : एक छंद आता व्यवसाय बनण्याच्या वाटेवर असतांना या दोन्ही बंधूंची उमेद वाखाणण्याजोगी आहे..!
Bus Model
Bus Model esakal
Updated on

ॲड. बाळकृष्ण पाटील

Jalgaon News : एखाद्याला एखादी कल्पना सुचावी, पुढे तो छंद बनावा आणि त्या छंदाचे रूपांतर व्यवसायात होऊन तेच उदर निर्वाहाचे साधन बनावे आणि तीच पायवाट धुंडाळत आयुष्याची किरणे दिसावित असे कधीनवद घडते. चुंचाळे (ता. चोपडा, जि.जळगांव) येथील कोळी बंधूंच्या बाबतीत हेच झाले आहे.

चोपडा आगारातील चालक भगवान महारु कोळी यांची मुले पवन आणि मोहन यांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसचे पहिल्यापासूनच आकर्षण होते. Jalagaon Chopda MSRTC depot driver bhagwan koli family making bus model got famous in abroad countries)

घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे अनुक्रमे बारावी आणि बी ए चे शिक्षण झालेल्या कोळी बंधूनी आधी कागदाच्या कलाकृती बनवण्याच्या सवयीतून कागदाची एस टी बनवली. वडिलांचे मार्गदर्शन मिळाल्याने त्यांच्या छंदाला धुमारे फुटू लागले. आणि नव्या कल्पनेने मनात घर केले. आणि एक दिवस ऍक्रेलीक फोम शिट वापरून बसची निर्मिती झाली.

कलारींग साठी झिकझॅक मशीनचा आणि सीएनसी मशीनच्या वापरातून दरवाजे, खिडक्या, चाके, कॅरिऍर, सर्वच बनून सुंदर बस तयार झाली. वडील राज्य परिवहन महामंडळातील सेवेमुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना माहिती झाली. त्यातून हळूहळू पोलीस व्हॅन,अग्निशमन गाडी,ट्रक,टेम्पो,बोलेरो, पीक अप व्हॅन,बँड गाडी,अँबू लस,जीप ची निर्मिती होत गेली.

गोव्याची कदंबा बस, हरियाणा, गुजरातच्या बसचे मॉडेल आता ते बनवतात. त्यावर राज्य महामंडळाचे नाव, बस जात असलेल्या गावाचे बोर्ड,आगाराचे नाव असलेली हुबेहूब बस ते तयार करतात. बस मॉडेलची मागणी झाली. पत्री आणि लाकडी मॉडेलही बनवणे सुरू झाले आहे.

Bus Model
Jalgaon News : प्रेमविवाहापूर्वीच युवक, युवती ताब्यात; मेहुणबारे पोलिसांकडून समुपदेशन

बस थेट विदेशात..

कोळी बंधूंच्या बस चोपडा आगार,पिंप्री चिंचवड चे भक्ती शक्ती आगार,अकोला आगारात आहेत. पुणे येथील डॉ.गावडे यांनी गाडी नेली ती पाहून त्यांच्या मध्यस्तीतून सायप्रस,इंग्लंड आणि दुबईतही बस पोहचल्या असल्याचे त्यांनी सकाळ ला सांगितले. आता ते मागणी प्रमाणे दीड फुटापासून पाच फूट पर्यंत लांब असलेली वाहने ते बनवितात.

वडीलांसह शिक्षक बी जी महाजन,अली खाटीक,नाशिकच्या सुकमल आर्ट्स चे निवृत्ती वाघ, एस टी महामंडळाचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर, चोपड्याचे संदेश क्षीरसागर आदींचे मार्गदर्शन लाभल्याचे कोळी बंधूनी सांगितले.

त्यांच्या मतानुसार खानदेशात तरी त्यांच्या कले सारखा छंद पुढे कोणी नेला नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.सुचेल ती कल्पना आणि मॉडीफिकेशन करण्यावर त्यांचा भर आहे.आतापर्यंत कोळी बंधूनी ५५० वाहने तयार करून विकली असून साईझ नुसार किंमत ठरवून ते वेगवेगळे मॉडेल तयार करून देतात. एक छंद आता व्यवसाय बनण्याच्या वाटेवर असतांना या दोन्ही बंधूंची उमेद वाखाणण्याजोगी आहे..!

Bus Model
Jalgaon News : शिवसेना ठाकरे पक्षाच्या उमेदवार आज ठरणार; जळगाव लोकसभा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.