Jalgaon Stray Dogs Attack : रावेरमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांचा 11 जणांना चावा; बालक गंभीर

Stray Dogs Attack : शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने आठ बालके व तीन व्यक्तींसह ११ जणांना चावा घेतला. यात एक बालक गंभीर जखमी झाले.
Packs of dogs roaming freely on Utkheda Road in the city.
Packs of dogs roaming freely on Utkheda Road in the city.esakal
Updated on

रावेर : शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने आठ बालके व तीन व्यक्तींसह ११ जणांना चावा घेतला. यात एक बालक गंभीर जखमी झाले. रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. गंभीर बालकास जळगावला हलविले आहे. दरम्यान, पालिकेने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. रावेर शहरात अनेक दिवसांपासून १५ ते २० कुत्र्यांचे टोळके फिरत आहे. सोमवारी (ता. ७) सकाळी सावदा रोडवरील यशवंत माळवे (वय २) यास दोन्ही गाल व ओठावर पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेऊन गंभीर जखमी केले. (11 people bitten by stray dogs in Raver and child serious )

त्यास येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविले आहे. नंतर कुत्र्याने शेख रशीद शेख आसिफ (१२), समर्थ करतार जाधव (१०), आस्मिन खान (६), रेहान फारूक खाटीक (१६), शेख हसन शेख अजहर (साडेचार वर्षे), अथर्व (६), माही दिलीप विंचूरकर (साडेचार वर्षे) ही आठ बालके, तसेच नितीन हिराचंद महाजन (३४), अल्ताफ शेख गफार (३५), आनंद दत्तात्रय वाणी (५०) यांना चावा घेऊन जखमी केले. जखमींना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. निकिता चौधरी, मोहिनी भारंबे, योगिता धिमळ, अन्नू चावरे, सतीश सूर्यवंशी यांनी जखमींवर उपचार केले.

मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा

शहर व नवीन वसाहतीत मटण दुकानांसमोर मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरू असून, पादचारी व वाहनधारकांना अडथळा निर्माण होत आहे. यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. पालिकेने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. (latest marathi news)

Packs of dogs roaming freely on Utkheda Road in the city.
Stray Dogs Attack : जेलरोडला भटक्या कुत्र्याचा चिमुरड्यांना चावा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.