Jalgaon: खोट्या बिलांद्वारे साडेबारा कोटींचा GST बुडवला! अन्वेषण शाखेकडून कारवाई, 65 कोटींच्या बोगस बिलाप्रकरणी व्यावसायिकास अटक

Crime News : महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अधिनियम २०१७ च्या तरतुदीचे उल्लंघन केल्याने धनगर यांना महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाच्या जळगाव कार्यालयातील अन्वेषण शाखेने गुरुवारी (ता. १) अटक केली आहे.
Criminal arrested
Criminal arrestedesakal
Updated on

Jalgaon News : येथील स्वामी ट्रेडिंग कंपनीची पथकाने तपासणी केली असता, कंपनीचे मालक नामदेव दौलत धनगर यांनी कुठल्याही मालाची विक्री न करता तब्बल ६५ कोटींची खोटी बिले देऊन शासनाचा १२.६५ कोटी रुपयांचा कर बुडविला आहे.

महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अधिनियम २०१७ च्या तरतुदीचे उल्लंघन केल्याने धनगर यांना महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाच्या जळगाव कार्यालयातील अन्वेषण शाखेने गुरुवारी (ता. १) अटक केली आहे. (12 half crore GST lost through fake bills)

न्यायालयीन कोठडीत रवाना

या व्यक्तीस प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली. ही कारवाई राज्य कर सहआयुक्त सुभाष भवर, यांच्या मार्गदर्शनाखाली, राज्य कर उपायुक्त सूर्यकांत कुमावत यांच्या नेतृत्वात सहाय्यक राज्यकर आयुक्त माहुल इंदाणी, सहायक राज्यकर आयुक्त रामलाल पाटील यांनी केली. या पथकात राज्यकर निरीक्षक प्रशांत रौंदळ, संदीप पाटील, योगेश कानडे, स्वप्नील पाटील, दीपक पाटील, सिद्धार्थ मोरे, संध्या वाकडे, श्वेता बागूल व कर सहायक परमेश्वर इंगळे यांचा समावेश होता. (latest marathi news)

Criminal arrested
Kalyan Crime News: आईच्या मृतदेहासोबत 'तो' एकटाच रहात होता; १४ वर्षीय मुलाचा धक्कादायक प्रकार

कर चुकविणाऱ्यांना इशारा

या प्रकरणातील इतर संबंधितांवरही लवकरात लवकर कारवाई केली जाणार आहे. महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाची या आर्थिक वर्षातील ही सातवी अटक असून, विभागाने खोट्या कर वजावटीचा दावा करणाऱ्या व खोटी बिले देऊन कर चुकवेगिरी करणाऱ्या करदात्यांना या कारवाईतून गंभीर इशारा दिल्याचे मानले जात आहे.

Criminal arrested
Jalgaon Crime News : शिवाजीनगर स्मशानभूमीजवळ जबरी रस्ता लूट! वाहनावर दगड मारून व्यावसायिकास लुटले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.