जळगाव : जिल्ह्यात यंदा सुमारे १४० टक्के पाऊस झाला असल्याने आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार नाही, अशी चिन्हे होती. असे असले तरी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून यंदा ५२७ गावांत पाणीटंचाई होईल, असा अंदाज वर्तवित तब्बल १० कोटी १५ लाखांचा पाणीटंचाई आराखडा तयार केला आहे. जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या योजनांचे काम सुरू असून, काही कामे पूर्णत्वास येत आहेत. परतीचा पाऊस देखील चांगला झाला असल्याने यंदा पाणीटंचाईची दाहकता कमी असेल, असा अंदाज ग्रामीण पाणीपरवठा विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. (140 percent rain in district 10 crore shortage plan for 527 villages in various taluks submitted to administration )