Jalgaon News : एरंडोल ट्रामा सेंटरसाठी 15 कोटी मंजूर! आमदार चिमणराव पाटील यांची माहिती

Jalgaon News : एरंडोल येथे मंजूर असलेल्या ट्रामा सेंटरच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती आमदार चिमणराव पाटील यांनी दिली.
Fund
Fund esakal
Updated on

Jalgaon News : येथे मंजूर असलेल्या ट्रामा सेंटरच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती आमदार चिमणराव पाटील यांनी दिली. दरम्यान ट्रामा सेंटरच्या बांधकामामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळून त्यांना जीवदान मिळण्यास मदत होणार आहे. एरंडोल राष्ट्रीय महामार्गावर असल्यामुळे नवीन ट्रामा सेंटरची मागणी अनेक दिवसांपासून नागरिक करीत होते. (Jalgaon News)

आमदार चिमणराव पाटील यांनी ट्रामा सेंटरच्या नवीन इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. राष्ट्रीय महामार्गावर कायम अपघात होत असल्यामुळे शहरात ट्रामा सेंटरची आवश्यकता होती. महामार्गावर अपघात झाल्यास जखमींवर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना जळगाव येथे पाठविण्यात येत होते.

ट्रामा सेंटरच्या नवीन इमारत बांधकामामुळे गरजू रुग्णांवर वेळेवर उपचार होऊन त्यांना जीवदान मिळण्यास मदत होईल. राज्याच्या अर्थसंकल्पात मतदारसंघातील अंजनी प्रकल्प व पद्मालय प्रकल्पांसाठीही प्रत्येकी दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून. (latest marathi news)

Fund
Jalgaon Police Transfer : चोपडा येथील 25 पोलिसांची बदली!

शहरातील नवीन वसाहतींमधील रस्त्यांच्या कामांसाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून दहा कोटी रुपये मंजूर झाल्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पाच वर्षांत मतदारसंघात विविध विकासकामे झाली असून, मतदारसंघातील सर्व गावांना.

तसेच सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी सांगितले. दरम्यान, ट्रामा सेंटरच्या इमारत बांधकामासाठी निधी मंजूर झाल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Fund
Jalgaon News : राज्यातील सर्वच कारागृह हाउसफुल : डॉ. सुपेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.