BSNL 4G
BSNL 4Gesakal

Jalgaon News : अमळनेर तालुक्यात 17 BSNL 4G चे टॉवर! जलद नेटवर्क मिळण्याची अपेक्षा

Jalgaon News : भारत दूरसंचार निगम लिमिटेड म्हणजे बीएसएनएल ने कात टाकणे सुरू केले आहे.
Published on

अमळनेर : भारत दूरसंचार निगम लिमिटेड म्हणजे बीएसएनएल ने कात टाकणे सुरू केले आहे. अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागात १७ बीएसएनएल चे फोर जी नेटवर्क टॉवर उभारणीसाठी शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी मोफत जागा उपलब्ध करून दिली. यामुळे ग्राहकांना आता फास्ट नेटवर्क आणि उत्तम सुविधा मिळणार आहेत. (Jalgaon 17 BSNL 4G towers in Amalner taluka marathi news)

भारत दूरसंचार निगम लिमिटेड या शासकीय यंत्रणेची परिस्थिती बिघडल्याने कर्मचाऱ्यांना निवृत्ती देण्यात आली होती. यंत्रणा आधुनिक होत नव्हती.शासनाकडून मदत मिळत नव्हती. लँडलाईन फोन बंद पडत होते. सेवा देण्यासाठी कर्मचारी कमतरता होती. तर मोबाईल नेटवर्क थ्री जी मिळत असल्याने ग्राहक बीएसएनएल सिम घ्यायला नकार देत होते. किंवा कंपनी बदलून घेत होते.

खासगी कंपन्या ५ जी नेटवर्क व ठिकठिकाणी टॉवर देत असताना बीएसएनएल कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता. मात्र आता बीएसएनएल ने पुन्हा नव्याने उभारी घेतली आहे. केंद्र शासनाकडून अनुदान व मदत मिळू लागली आहे. बीएसएनएल ने कात टाकून ग्राहकांना अत्याधुनिक सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. (latest marathi news)

BSNL 4G
Eknath Khadse News : प्रकृतीमुळे मी लढणार नसल्याचे पवारांनी आधीच जाहीर केलेय; एकनाथ खडसे खडसेंची माहिती

येथे लागणार टॉवर

अमळनेर तालुक्यात एकलहरे ,बामणे ,जैतपिर ,भोरटेक ,कलाली ,आंचलवाडी , निसर्डी ,खडके , वाघोदे , दापोरी , गंगापुरी ,खापरखेडा प्र डांगरी , खापरखेडा प्र जळोद , खेडी प्र डांगरी , जुनोने , आटाळे,आनोरे या गावांना ४ जी नेटवर्क चे टॉवर उभारले जाणार आहेत. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या प्रत्येक गावाला २०० चौ मी जागा टॉवर उभारणीसाठी बीएसएनएल ला मोफत दिल्याने बीएसएनएल ने उभारी घेतली आहे. तर खापरखेडा प्र जळोद येथे नारायण पाटील यांनी २०० चौ मी जागा दान दिली आहे.

विशेष म्हणजे याठिकाणी सोलर पॅन ,जनरेटर ,बॅटरी , पॉवर प्लांट , ४ जी बी टी एस साहित्य लावण्यात येणार आहे. यासाठी दूरसंचार महाप्रबंधक महेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ,उपमंडल अभियंता पंकज रायसिंघानी परिश्रम घेत आहेत. जेथे नेटवर्क टॉवर नव्हते त्याठिकाणी बीएसएनएल नेटवर्क टॉवर उभारले जाणार आहेत. आतापर्यंत दापोरी ,जैतपिर ,खापरखेडा प्र जळोद या तीन ठिकाणी टॉवर उभारले गेले आहेत.

"शहरात सर्वत्र तांब्याची तार असलेल्या वायर काढून ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यात येणार आहे. तर ज्यांच्याकडे जुने लँडलाईन कनेक्शन आहे त्यांना इंटरनेट चे राऊटर मोफत देण्यात येणार आहे."- पंकज रायसिंघानी , उपमंडळ अभियंता, अमळनेर

BSNL 4G
Lok Sabha Election 2024 : महायुतीचा जागा वाटपाचा घोळ संपेना; नवा उमेदवार द्यायचा, तर त्याचीही वानवा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()