Jalgaon News : दोनच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांवर 17 केंद्रांचा भार; पारोळा तालुक्यातील स्थिती

Jalgaon : तालुक्यात २०१९च्या पशुगणनेनुसार एक लाख तीन हजार जनावरांची नोंदणी करण्यात आली आहे.
Veterinary Hospital building here.
Veterinary Hospital building here.esakal
Updated on

Jalgaon News : तालुक्यात २०१९च्या पशुगणनेनुसार एक लाख तीन हजार जनावरांची नोंदणी करण्यात आली आहे. ग्रामीणसह शहरी भागातील पशुंच्या आरोग्यासाठी तालुक्यात श्रेणी एकचे चार पशुवैद्यकीय दवाखाने व श्रेणी दोनचे तेरा पशुवैद्यकीय केंद्र आहेत. या प्रत्येक पशुवैद्यकीय केंद्रावर एक पशुधन अधिकारी असणे गरजेचे आहे. मात्र, रिक्तपदांमुळे तब्बल १७ पशुवैद्यकीय केंद्रांचा कारभार दोनच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांवर सुरू आहे. (17 centres in Parola taluka with only two veterinary officers )

त्याचा परिणाम म्हणून जनावरांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने पशुपालक हैराण झाले आहेत. म्हणून रिक्त पदे त्वरित भरावीत, अशी मागणी तालुक्यातील पशुमालकांनी केली आहे. तालुक्यात गाय व म्हैसवर्गीयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे जनावरांवर योग्यवेळी योग्य उपचार व्हावा, यासाठी तालुक्यात १७ पशुवैद्यकीय दवाखाने कार्यान्वित आहेत. मात्र, सध्यास्थितीत दोनच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांवर या पशुवैद्यकीय दवाखान्यांची मदार आहे.

त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना खूपच धावपळ करीत उपचारासाठी जावे लागत आहे. परिणामी अनेकदा वेळेअभावी उपचार होत नसल्याने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांवर पशुपालकांचा रोष ओढवून घ्यावा लागत आहे. त्यामुळे बऱ्याचदा पशुपालक व पशुवैद्यकीय दवाखान्यांमधील कर्मचाऱ्यांत वादही निर्माण झाल्याचे प्रकार होत आहेत.

सध्या पावसाळ्यात शेळ्या, मेंढ्या यांच्यावर होणारे संसर्ग आजार वेळोवेळी जनावरांना केले जाणारे लसीकरण, शासन निर्देशित करीत असलेल्या मार्गदर्शक सूचना या साऱ्या गोष्टींचा विचार करता दोनच पशुवैद्यकीय अधिकारी तालुक्यातील १७ पशुवैद्यकीय अधिकारी नियोजन कसे करतील, हादेखील महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणून याबाबत गांभीर्याने दखल घेऊन संबंधित पशुधन आयुक्त यांनी तालुक्यातील रिक्त पदांबाबत योग्य तो पाठपुरावा करून त्वरित पदे भरावीत, अशी मागणी पशूमालकांकडून केली जात आहे. (latest marathi news)

Veterinary Hospital building here.
Jalgaon News : शाळेच्या पटांगणात खेळताना नववीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू!

पदेरिक्त असलेली गावांची नावे

श्रेणी एकची पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये भिलाली, तामसवाडी, पारोळा, शिरसोदे, शिरसमणी यांचा तर, राज्यस्तरीय श्रेणी दोनमध्ये असलेली पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये बोळे, पळासखेडे बुद्रुक, पळासखेडे सिम, सावखेडाहोळ, जोगलखेडा, आडगाव, उंदीर खेडे, मोंढाळे, म्हसवे रत्नापिंप्री, इंधवे, मंगरूळ येथील दवाखान्यांचा समावेश आहे.

''जिल्हा परिषदेअंतर्गत पशुवैद्यकीय दवाखान्यातील रिक्तपदे भरली गेली आहेत. त्यांचे प्रशिक्षण सुरू करण्यात आलेले आहे. त्यामुळे आता रिक्तपदांवरील पशुवैद्यकीय अधिकारी लवकर आपला पदभार स्वीकारतील.''-डॉ. वाहेद तडवी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव.

''पारोळा तालुक्यातील श्रेणी दोनच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांसंदर्भात रिक्तपदांबाबत पाठपुरावा सुरू आहे. लवकरच पाच ते सात पशुवैद्यकीय अधिकारी काही दिवसांत पदभार स्वीकारणार आहेत.''- एस. एस. महाजन, सहायक आयुक्त, पशुसंवर्धन विभाग, धरणगाव.

Veterinary Hospital building here.
Jalgaon News : अखेर 502 कोटीच्या यावल उपसा सिंचन; योजनेस मुख्यमंत्र्यांची तत्वतः मान्यता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.