Jalgaon News : रावेर नगर परिषदेचा २०२४-२५ मधील शिलकीचा अर्थसंकल्प प्रांताधिकारी तथा प्रशासक देवयानी यादव यांनी मंजूर केला असून सदर अर्थसंकल्पात विविध विकास कामात शासकीय योजना मध्ये प्राप्त अनुदानातून भरीव तरतूद आहे. तसेच शहरातील नागरिकांसाठी दिलासादायक बाब म्हणजे या अर्थसंकल्पात मागील सर्वेनुसार चतुर्थकर वाढ करण्यात आलेली असून बाकी अतिरिक्त कोणत्याही प्रकारची कर वाढ नाही. हा आर्थिक वर्षाचा शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. (Jalgaon 17 crore budget of Raver Municipal Council)
यामध्ये एकूण अर्थसंकल्प १०० कोटीचा असून शिल्लक १७ कोटी २२ लाख इतकी आहे तर ५५ कोटी ८५ लाख भांडवली जमा व ५५ कोटी २८ लाख भांडवली खर्च आहे. तर महसूल जमा ४५ कोटी ६८ लाख इतकी तर महसूल खर्च ४४ कोटी ४८ लाख इतका आहे. सदर अर्थसंकल्प विशेष नगरोथान अभियानात ३ कोटी २० लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
रस्त्यासाठी सुमारे २ कोटी दलितेतर योजना २ कोटी ८८ लाखाची तरतूद करण्यात आली आहे. याचप्रमाणे वैशिष्ट्यपूर्ण कामे ३ कोटी ६७ लाख.(latest marathi news)
विशेष रस्ता ५ कोटी तर हद्दवाढ योजनासाठी ११ कोटी अशा विविध योजना शासन निधीवर अवलंबित असल्याचे सांगण्यात आले. यात दिव्यांगासाठी तरतूद, शहर सुशोभीकरण यासाठीही पुरेशी तरतूद करण्यात आली आहे.
अर्थसंकल्प मुख्याधिकारी स्वालीहा मालगावे यांच्या मार्गदर्शनाखाली लेखापाल भारती पाटील यांनी तयार करून पालिकेचे प्रशासक देवयानी यादव यांच्याकडे सुपूर्द केला. त्यांनी त्यास मान्यता देऊन सदर अर्थसंकल्प जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आल्याचे पालिका मुख्याधिकारी स्वालीहा मालगावे यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.