Jalgaon News : विधानसभा मतदार संघातील, एरंडोल, पारोळा आणि भडगाव तालुक्यातील सुमारे ७२ किलोमीटर लांबीच्या शेत-पाणंद रस्त्यांच्या कामांसाठी सुमारे १७ कोटी ८७ लाख रुपये मंजूर झाले असल्याची माहिती आमदार चिमणराव पाटील यांनी दिली.
पारोळा, भडगाव आणि एरंडोल तालुक्यातील शेत-पाणंद रस्त्यांसाठी सुमारे अठरा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, लवकरच कामांना सुरवात होणार असल्यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. (17 crore sanctioned for Farm Roads in Erandol Constituency)
मतदारसंघातील एरंडोल तालुक्यातील चौदा, भडगाव तालुक्यातील दोन आणि पारोळा तालुक्यातील २४ गावांमध्ये मातोश्री ग्रामसमृद्धी शेत-पाणंद रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. भडगाव तालुक्यातील गिरड, आंचलगाव या दोन गावांमधील रस्ते होणार आहेत.
एरंडोल तालुक्यातील उत्राण अहिरहद्द, रवंजे बुद्रुक, आडगाव, खर्ची खुर्द, टाकरखेडा, वनकोठे, आनंदनगर, खेडी खुर्द, कढोली, नागदुली, तळई, फरकांडे, भालगाव, नांदखुर्द या गावांमध्ये शेत पाणंद रस्त्यांच्या कामास मंजुरी मिळाली आहे.
पारोळा तालुक्यातील चोरवड, वसंतवाडी, हिरापूर, मेहू, लोणी खुर्द, बोदर्डे, शेलावे, बाहुटे, महालपूर, इंधवे, तरडी, देवगाव, वडगाव लांबे, दगडी सबगव्हाण, टिटवी, शेवाळे खुर्द, जोगलखेडे, हनुमंतखेडे, वाघरे, करंजी, शिरसमणी, बोळे, सावखेडे, नंदाळे बुद्रुक या गावातील रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे.
दरम्यान, शेत-पाणंद रस्त्यांच्या कामांसाठी निधी मंजूर झाल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची होणारी गैरसोय दूर होणार असल्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी सांगितले.निवडणुकीत मतदारांना दिलेले आश्वासने पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.