Jalgaon Accident News : जळगाव-धरणगाव रोडवर मुसळी ते चिंचपुरा गावादरम्यान सुसाट कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात होऊन १९ वर्षीय चालक जागीच ठार झाला, तर धरणगाव येथील कीर्तनकार सुरेश अहिरे महाराजांच्या छातीला जबर दुखापत झाली. राज महेंद्र शिरसाट (वय १९ रा. सार्वे, ता. धरणगाव) असे मृताचे नाव आहे. एकुलता एक मुलगा गेल्याने कुटुंबीयांनी शासकीय रुग्णालयात आक्रोश केला. (Jalgaon 19 year old driver died on spot in an accident after driver lost control of car)
सीटबेल्ट लावला असता, तर चालकाचा जीव वाचला असता, असे अपघातस्थळी मदत करणाऱ्यांनी सांगितले. सार्वे बुद्रुक (ता. धरणगाव) येथील राज शिरसाट धरणगावच्या कला-वाणिज्य महाविद्यालयात प्रथम वर्ष पदवीचे शिक्षण घेत होता. गुरुवारी (ता. ४) दुपारी राज शिरसाट व कीर्तनकार सुरेश अहिरे महाराज कार (एमएच ०९, डीएक्स ८९९१) घेऊन बँकेच्या कामानिमित्त जळगावला आले होते.
काम आटोपल्यानंतर सार्वेकडे जात असताना, दुपारी तीनच्या सुमारास चिंचपुऱ्याजवळ सुसाट कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळली व कार दोन वेळा उलटली. त्यामुळे कारचा चेंदामेंदा झाला. या अपघातात कारचालक राज शिरसाट जागीच ठार झाला, तर सार्वेकर महाराज गंभीर जखमी झाले आहेत.
शिक्षक डी. के.पाटील यांनी ग्रामस्थांच्या मदतीने कारमधून सार्वेकर महाराजांना व राजला बाहेर काढून तातडीने जळगाव जिल्हा रुग्णालयात रवाना केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून राजला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सार्वे ग्रामस्थांसह नातेवाइकांनी शासकीय रुग्णालयात धाव घेतली. राज याचा मृतदेह पाहताच कुटुंबीयांनी हंबरडा फोडला.
दरम्यान, सुरेश अहिरे यांनी काही महिन्यांपूर्वीच कार घेतली आहे. अपघातावेळी कारमधील एअरबॅग्स उघडल्या नाहीत. परिणामी, कारमधील दोघांना जबर दुखापती झाल्या. त्यात चालकाच्या डोक्याला मार लागून खोलवर जखम झाल्याने त्याचा मृत्यू ओढवला. अपघातापूर्वी चालकाने सीटबेल्ट लावला असता.
तर वाहनाच्या पुढील किंवा मागील भागात धडक बसताच आतील सर्वच्या सर्व एअरबॅग्ज् क्षणार्धात उघडल्या असत्या. कारचालक सीटबेल्ट लावणे विसरला असावा, म्हणून कारचा चुराडा झाल्याचे कार डिलर्सकडून सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.