अमळनेर : शहरासाठी जलसंजीवनी ठरणाऱ्या २४ बाय ७ या नगरपरिषदेच्या नवीन पाणीपुरवठा प्रकल्पास नगरोत्थान योजनेंतर्गत राज्य शासनाची मंजुरी मिळाली असून, याबाबतचा शासन निर्णय मंगळवारी (ता.१३) प्रसिद्ध झाला. मंत्री अनिल पाटील यांच्या पाठपुराव्याने योजनेला मंजुरी मिळू शकली आहे. (197 Crore water scheme approved for Amalner Benefits from Padalsare Dam)