Jalgaon Cyber Fraud : खात्यातून 2 लाख 81 हजार रुपये सायबर चोरांकडून लंपास

Cyber Fraud : तालुक्यातील चौगाव येथील रहिवासी बापूराव आधार पाटील ( ४७ ) यांचे चोपडा येथील बंधन बँकेत खाते आहे.
Cyber crime
Cyber crimeesakal
Updated on

Jalgaon Cyber Fraud : तालुक्यातील चौगाव येथील रहिवासी बापूराव आधार पाटील ( ४७ ) यांचे चोपडा येथील बंधन बँकेत खाते आहे. दि.२७ जून रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर आधार,ओटीपी असे चार ते पाच वेळेस मेसेज आले. आधार पाटील यांना मेसेजचा संशय आल्याने त्यांनी तपास करण्याकरता बँकेत संपर्क साधला असता त्यांच्या खात्यातून २ लाख ८१ हजार ४२१ रुपये सायबर चोरांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली. (2 lakh 81 thousand rupees stolen from account by cyber thieves )

विशेष म्हणजे सायबर चोरांनी पाटील यांच्या खात्यातून ही रक्कम ही एकाच वेळेस न काढता चार ते पाच वेळेस अशी मिळून काढलेली दिसून आली आहे. या घटनेनंतर बापूराव पाटील यांनी सायबर पोलिस यांच्याकडे ऑनलाश्रन तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर ती तक्रार चोपडा येथील ग्रामीण पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आलेली आहे.

Cyber crime
Cyber Fraud : बँक खातेदारांना न्यायालयाचा दिलासा

बापूराव पाटील यांनी चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात येऊन फिर्याददेखील नोंदविली आहे. या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात भादंवि ४२०प्रमाणे सायबर गुन्हे कलम ६६नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर करीत आहेत.

Cyber crime
Jalgaon Cyber Fraud : जळगावाच्या डॉक्टराला 19 लाखांचा ऑनलाईन गंडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.