अमळनेर : राज्यात एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत काम करणाऱ्या सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्चपासून मानधन रखडले होते. याबाबत ‘सकाळ’ने वृत्तही प्रसिद्ध केले होते. तसेच महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेने पाठपुरावा ही केला होता. (Jalgaon 2 lakh Anganwadi employees in state have been paid dues)
शासनाने याची दखल घेत दोन दिवसांपासून मानधन मिळण्यास सुरुवात झाली असून, त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आथिर्क दिलासा मिळाला आहे. लोकसभा निवडणूक आणि लग्नसराईची धामधूम असताना अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली होती.
या समस्येला वाचा फोडावी, यासाठी रविवारी (ता. २१) ‘सकाळ’मध्ये ‘अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन रखडले’ या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध झाली होती. (latest marathi news)
त्याचबरोबर मार्च २०२४ पासूनचे रखडलेले मानधन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तत्काळ अदा करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेने गेल्या आठवड्यात शासनाकडे केली होती.
या मागणीची दखल घेत दोन दिवसांपासून मानधन मिळण्यास सुरवात झाली असून, त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आथिर्क दिलासा मिळाला आहे. संघटनेने केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी. पाटील यांनी कळविले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.