जळगाव : वाढती महागाई कुटुंबीयांच्या अपेक्षा, मुलांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी पालकांची मरमर सुरू आहे. भाकरीचा चंद्र शोधण्यात व्यस्त झालेल्या पालकांना कुटुंबातील मुला-मुलींशी संवाद साधण्यास उसंतच नसल्याने एक मर्यादेपर्यंत कुंथून आयुष्य जगणारी मुले आता डिजिटल संवादाच्या नादी लागली आहेत. हवे ते पालकांकडून देण्याच्या प्रयत्नात अत्यावश्यक मोबाईल, सोशल मीडियाच्या माध्यमातून आभासी सुखाच्या कल्पनेत अल्पवयीन मुली टोकाचा निर्णय घेत, घर सोडून जाण्याचे प्रमाण वाढत आहे. (2 minor girls go missing every day falling prey to scams)