Jalgaon Crime : ‘वॉरंट’वरील गुन्हेगारांचे अटकसत्र; ‘एसपीं’च्या तंबीनंतर महिनाभरात 201 संशयित गजाआड

Jalgaon Crime : अत्याधुनिक आणि अतिजलद ऑनलाइन प्रणालीमुळे जळगाव शहरासह जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यांना शंभरटक्के वॉरंट बजावणीचे लक्ष्य पूर्ण करावे लागते.
Crime
Crimeesakal
Updated on

जळगाव : अत्याधुनिक आणि अतिजलद ऑनलाइन प्रणालीमुळे जळगाव शहरासह जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यांना शंभरटक्के वॉरंट बजावणीचे लक्ष्य पूर्ण करावे लागते. असे असताना आजवर वॉरंटवरील गुन्हेगारांकडून ‘चिरीमिरी’ घेऊन न्यायालयातून वॉरंट रद्दचा सल्ला देणाऱ्या फितुरीला जिल्हा पोलिस अधीक्षकांनी चाप लावला आहे. पोलिस अधीक्षकांनी अजामीनपात्र वॉरंटची शंभर टक्के बजावणी करण्याची पोलिस कर्मचाऱ्यांना तंबी दिल्यानंतर महिनाभरात २०१ गुन्हेगारांना जेलची हवा खावी लागली आहे. (201 suspects arrested within month after SP arrest of criminals on warrant )

न्यायालयीन कामकाजांना हजर न राहणाऱ्यांना त्या- त्या न्यायालयातर्फे समन्स-वॉरंटची बजावणी करण्यात येते. वारंवार गैरहजर राहिल्यास अजामीनपात्र (नॉन बेलेबल वॉरंट)) अर्थात अटक वॉरंट बजावणी करण्याचे आदेश न्यायालयातर्फे दिले जातात. मात्र, वॉरंटची बजावणी करण्याचे कर्तव्य ज्या पोलिस कर्मचाऱ्यांना दिले जात होतो, त्यातील काही पोलिस कर्मचारी संबंधित गुन्हेगारांना वॉरंट बजावणी करण्याऐवजी तुमचा वॉरंट निघालाय कोर्टातून तो रद्द करवून घ्या, असा सल्ला वजा फितुरी करीत वरकमाई करीत होते.

पोलिसांच्या अशा वागण्यामुळे न्यायालयीन कामकाजावर याचा वाईट परिणाम होऊन न्यायालयाच्या आदेश न जुमानणाऱ्यांची सुटका होत होती. पोलिसांना हजार, दोन हजार रुपये देऊन तो गुन्हेगार किंवा खटला सुरू असलेला संशयित दुसऱ्या दिवशी न्यायालयात वकील उभा करून वॉरंट रद्द करवून घेत असे. आता मात्र त्याला जिल्‍हा पोलिस अधीक्षकांनी ब्रेक लावला असून, ज्यांचा अजामीनपात्र (नॉनबेलेबल) वॉरंट निघाला आहे, त्यांना अटकेला सामोरे जावेच लागणार आहे.

ऑनलाइन वॉरंट बजावणी

न्यायालयीन कामकाजात गतिमानता यावी, या उद्देशाने काही वर्षांपासून ऑनलाइन वॉरंट-समन्सचा अवलंब करण्यात येत आहे. यासाठी खास वेबसाईटही कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. त्या- त्या न्यायालयाकडून संबंधित पोलिस ठाण्यांना ऑनलाइन पद्धतीने वॉरंट बजावले जातात. संबंधित वॉरंट बजावणीची जबाबदारी असलेला कर्मचारी पोलिस ठाण्यातून मेलची प्रिंट काढून संबंधितांच्या पत्त्यावर वॉरंट घेऊन पोचत होता. यातही आता सुसूत्रता आणून पोलिस ठाण्यात पडलेला मेल थेट आता त्या कर्मचाऱ्याच्या रजिष्टर मोबाईलवर पाठवला जातो. जेणे करून तत्काळ बजावणी होईल. असे असतानाही बजावणीला अडथडे येत असल्याने बहुतांश वॉरंट रद्द करण्याचे प्रकार समोर येत होते.

Crime
Jalgaon Crime : निवृत्त सहाय्यक फैाजदाराला मुलाकडे जाणं पडलं महागात! बंद घर फोडून चोरट्यांनी रोकडसह लांबविले दागिने

शंभर टक्केचे लक्ष्य गाठा

वॉरंट बजावणीत नॉनबेलेबल वॉरंट असणाऱ्या गुन्हेगारांना अटक झाली तरच तो वॉरट बजावला गेला आहे, असे समजण्यात येईल. वॉरंट रद्द करण्यासाठी संशयित न्यायालयात पोहोचला म्हणजे त्या वॉरंटची बजावणी न होता पोलिसांकडून फितुरी झालीय, असे समजले जाईल, अशी तंबीच पोलिस अधीक्षकांनी दिल्यानंतर जिल्हाभरात अटकसत्राला आता सुरवात झाली असून, पोलिस अधीक्षकांच्या निर्णयाने चिरीमिरी घेणाऱ्यांना चाप बसला आहे. महिन्याभरातच २०१ संशयितांना वेगवेगळ्या पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी अटक केली आहे.

आठ उपविभागात २०१ अटकेत

जळगाव - ३१

भुसावळ - २७

मुक्ताईनगर - ३६

फैजपूर -१०

चोपडा -३१

अमळनेर -२२

चाळीसगाव -१९

पाचोरा -२५

''अजामीनपात्रा (नॉनबेलेबल) वॉरंटची बजावणी झाली म्हणजे आपल्याला जेलमध्ये जावेच लागेल, याची कल्पना संबंधितांना आल्यास ते वेळेत न्यायालयीन कामकाजाला हजर राहतील. न्यायालयीन कामकाज सुरळीत होण्यास आणि खटल्यांच्या कामातील अवरोध यातून दूर होणार आहे.''- बबन अव्हाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, गुन्हेशाखा

Crime
Jalgaon Crime : जिल्ह्यातील तिघांवर ‘एमपीडीए’ची कारवाई; पोलिस-महसूल प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.