Jalgaon News : वित्तीय संस्थांचे 22 लाखांचा दंड वसुल; ग्रामपंचायत थकबाकी वसूलीला शून्य प्रतिसाद

Jalgaon : न्यायालयात रविवारी राष्ट्रीय लोकअदालतीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या थकबाकीदारांच्या ३ हजार १३० प्रकरणांपैकी ६९ प्रकरण तडजोडीने निकाली निघाले, त्यातून २२ लाख ५७ हजार रुपये वसुल करण्यात आले.
22 lakh fine recover from financial institutions
22 lakh fine recover from financial institutionsesakal
Updated on

Jalgaon News : येथील न्यायालयात रविवारी राष्ट्रीय लोकअदालतीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या थकबाकीदारांच्या ३ हजार १३० प्रकरणांपैकी ६९ प्रकरण तडजोडीने निकाली निघाले, त्यातून २२ लाख ५७ हजार रुपये वसुल करण्यात आले. ग्रामपंचायतीची घरपट्टी व पाणी पट्टीच्या थकबाकीदारांचे एकुण १ हजार ७ प्रकरण होते, मात्र, एकाही प्रकरणात वसुली किंवा तडजोडीला प्रतिसाद मिळाला नाही. (Jalgaon 22 lakh fine recover from financial institutions)

राज्य विधी सेवा प्राधीकरण आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे यावल येथील न्यायालयात आज रविवारी (ता.३ ) विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश एस. बी. वाळके सह दिवाणी न्यायाधीश व्ही. एस. डामरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या लोकअदालतीत दिवानी व फौजदारी एकुण ४०१ प्रकरणापैकी ४८ प्रकरणांचा निपटारा होउन ७ लाख ३७ हजार ९९८ रूपये वसुल झाले.

बँका, वित्तीय संस्थासह बी.एस.एन.एल, वीज वितरण कंपनीच्या दाखल पुर्व २ हजार ७२९ प्रकरणापैकी २१ प्रकरणांचा निपटारा होउन १५ लाख १९ हजार ३२१ रूपये वसुल झाले. एकुण ६९ खटले निकाली, दिवाणी,फौजदारी व वित्तीय संस्थांचे २२.५७ लाखाचा वसुल झाले.

न्यायाधीश एस. बी. वाळके व पॅनल सदस्य ऍड. रितेश पुंडलीक बारी यांच्या पॅनल समोर चालले. दिवानी व फौजदारी एकुण ४०१ प्रकरण होते त्यापैकी ४८ प्रकरणांचा निपटारा होउन ७ लाख ३७ हजार ९९८ रूपयांचा वसुल झाला. वकील संघाचे पदाधिकारी ऍड. जी.एम. बारी, ऍड. ए.एम.कुळकर्णी. (latest marathi news)

22 lakh fine recover from financial institutions
Jalgaon Lemon Rates Hike : लिंबाच्या दरात वाढ; भाजीपाला स्थिर; गारपीट, ‘अवकाळी’मुळे आवक मंदावली

ऍड. नितिन चौधरी, ऍड. राजेश गडे, ऍड. एस.जी.कवडीवाले, ऍड. गौरव पाटील, न्यायालयाचे सहायक अधिक्षक अनिता श्रावगी, लघुलेखक ए.बी., लिपीक सी.एम. झोपे, एस.आर.तडवी, कनिष्ठ लिपीक एच. जी. सुर्यवंशी, जी.एस.लाड, एन. डी. राजपुत, डी.ए.गावंडे, पी.डी.चव्हाण, एस. एस. झांबरे, आर. डी. गोराणे, दिपाली घनमोडे यांनी परिश्रम घेतले.

ग्रामपंचायत थकबाकी ठप्प

ग्रामपंचायतीची घरपट्टी व पाणी पट्टीच्या थकबाकीदारांचे एकुण १ हजार ७ प्रकरण ठेवण्यात आले होते मात्र, एकाही थकबाकीदाराकडून वसुली किंवा तडजोडी साठी प्रतिसाद मिळाला नाही.

22 lakh fine recover from financial institutions
Jalgaon Lok Sabha Election News 2024 : रक्षा खडसेंच्या उमेदवारीने ‘राष्ट्रवादी’समोर पेच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.