चोपडा : सातपुडा पर्वत रांगांमधील आदिवासी गावासह लासूर, चौगाव या गावांना वीजपुरवठा करणारी ३३ केव्ही मुख्यवाहिनी चुंचाळे शिवारातून जाते. या रस्त्यावर एका शेतकऱ्याने सूबाभुळ वृक्षांची लागवड केली आहे. त्यामुळे हवा वादळ आले की, झाडांच्या फांद्यांच्या तारांना स्पर्श होताच लाईन ट्रीप होऊन वीजपुरवठा खंडित होतो.
असा प्रकार महिनाभरापासून सुरू असल्याने लासूरसह परिसरातील २० ते २२ गावे रात्रीबेरात्री अंधारात राहत आहेत. वीजअभावी पिण्याचा पाण्याचा प्रश्नही गंभीर झाल्याने यावर त्वरित उपाय करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. (Jalgaon 22 villages in area including Lasur power cut)