Jalgaon News : 3 मुलांची आई बेपत्ता; मुलांचे हाल पित्याकडून बघवेना; 2 महिने उलटून पोलिस दाद देईना

Jalgaon News : शहरातील दूध फेडरेशन राजमालतीनगरातील २६ वर्षीय विवाहिता सात वर्षीय मुलांसह दोन महिन्यांपासून बेपत्ता झाली आहे.
Sharda Jadhav and Rupesh Jadhav
Sharda Jadhav and Rupesh Jadhavesakal
Updated on

Jalgaon News : शहरातील दूध फेडरेशन राजमालतीनगरातील २६ वर्षीय विवाहिता सात वर्षीय मुलांसह दोन महिन्यांपासून बेपत्ता झाली आहे. पोलिसांत हरविल्याची तक्रार देऊन पत्नी व मुलाचा शोध लागत नसल्याने हवालदिल पिता रोज पोलिस ठाण्याच्या चकरा मारत आहे. जळगाव शहरातील दूध फेडरेशन राजमालतीनगरात मिथुन जाधव (वय ३५) कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. (Jalgaon Crime 26 year old married woman has been missing for 2 months)

रेल्वे मालधक्क्यावर हमाली करून ते कुटुयबाची गुजराण करतात. त्यांची पत्नी शारदा जाधव (वय २६) बचत गटाचे पैसे भरायला जाते, असे सांगून मुलगा रूपेश (वय ७) याला घेऊन घरातून गेली. ती अद्याप परत आलेली नाही. याबाबत शहर पोलिसांत हरविल्याची तक्रार नोंदवून दोन महिने उलटले, तरी पोलिसांना या महिलेचा शोध घेता येत नसल्याने मिथुन जाधव नियमितपणे पोलिस ठाण्यात चकरा मारून चौकशी करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

मुलांचे एकाकीपण पाहावेना

मिथुन जाधव यांना तीन मुले असून, पत्नी शारदा निघून गेल्यानंतर दोन्ही मुले त्यांच्याजवळच राहतात. दिवसभर मालधक्यावर हमाली करून थकून भागून आल्यावर घरी मुलांसाठी स्वतःला स्वयंपाक करावा लागतो. (latest marathi news)

Sharda Jadhav and Rupesh Jadhav
Jalgaon News : ‘त्या’ कर्मचारी भरतीस स्थगितीसह चौकशीही होणार!

मुलांना त्यांच्या आईची ओढ असून, त्यांचे प्रश्न बेजार करणारे व निरुत्तर करून जातत. साधारण एक ते दीड वर्षापूर्वी पत्नी शारदा अजय दिलीप जाधव (रा. संभाजीनगर, कैकाडी वाडा, रावेर) याच्यासोबत निघून गेली हेाती. आताही त्याच्यासोबत निघून गेल्याचे मी वारंवार पोलिसांना सांगितले.

गावात इतरांना ती त्याच्यासोबत दिसते. मात्र, पोलिसांना तिचा शोध लागत नाही. ती माझ्या सबत राहण्यास तयार नसेल, तर किमान पोलिसांनी तसे लिखित पत्र मिळवून द्यावे, अशी विनवणी मिथुन जाधव यांनी ‘सकाळ’शी बोलताना केली.

Sharda Jadhav and Rupesh Jadhav
Jalgaon Banana Crop : वाढत्या तापमानामुळे केळी बागा करपल्या; प्रचंड उष्णतेचा केळी पिकला फटका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.