Jalgaon News : खात्यावर आलेले 3 लाख रुपये केले परत; व्यापाऱ्याने मानले आभार

Jalgaon : जवळच असलेल्या वरगव्हाण (ता. चोपडा) येथील सरपंच भूषण गोरख पाटील यांच्या बँक खात्यावर एका व्यापाऱ्याने अचानक तीन लाख रुपये टाकले.
While congratulating Sarpanch Bhushan Patil for returning three lakh rupees to the account, Naval Singh Raje, M. V. Patil, D. B. Patil, Narayan Patil, Tushar Patil etc.
While congratulating Sarpanch Bhushan Patil for returning three lakh rupees to the account, Naval Singh Raje, M. V. Patil, D. B. Patil, Narayan Patil, Tushar Patil etc.esakal
Updated on

Jalgaon News : येथून जवळच असलेल्या वरगव्हाण (ता. चोपडा) येथील सरपंच भूषण गोरख पाटील यांच्या बँक खात्यावर एका व्यापाऱ्याने अचानक तीन लाख रुपये टाकले. ही बाब भूषण पाटील यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी लागलीच संबंधित व्यापाऱ्याला तीन लाख रुपये परत केले. सरपंच पाटील यांनी दाखविलेल्या प्रामाणिकणाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. सरपंच प्रवीण उर्फ भूषण पाटील हे वरगव्हाणचे आदर्श शेतकरी गोरख पाटील यांचे चिरंजीव आहेत. त्यांच्या खात्यावर शनिवारी तीन लाख रुपये टाकल्याचा मेसेज मिळाला. (3 lakh rupees received in account were returned and merchant thanked )

पीकविम्याचे पैसे असतील असे त्यांना वाटपले. मात्र, त्यांनी बँकेत जाऊन स्टेटमेंट चेक केले असता, ही रक्कम एका व्यापाऱ्याने टाकल्याचे त्यांच्या लक्षात आले. दरम्यान, व्यापाऱ्याने धानोरा येथील केळी व्यापारी आवेश खान यांना फोन लावला. त्याने लागलीच प्रवीण पाटील यांच्याशी संपर्क करीत या नावाची व्यक्ती आपल्या गावात कोण आहे? असे विचारले. (latest marathi news)

While congratulating Sarpanch Bhushan Patil for returning three lakh rupees to the account, Naval Singh Raje, M. V. Patil, D. B. Patil, Narayan Patil, Tushar Patil etc.
Jalgaon News : मामाने केला भाचीचा विनयभंग; चाळीसगाव तालुक्यातील घटना

त्यावेळी सरपंच पाटील यांनी आपणच ती व्यक्ती आहे व माझ्याच खात्यावर तीन लाख रुपये आले आहेत. कोणाचेही असोत आपण ते प्रामाणिकपणे परत करू, काळजी करू नये, असे सरपंच पाटील यांनी व्यापाऱ्याला सांगितले. त्यानुसार सरपंच पाटील यांनी आज बुधवारी संबंधित व्यापाराला तीन लाख रुपयांचा धनादेश दिला.

जळगाव येथे सत्कार

एका व्यापाऱ्याकडून चुकीने तीन लाख रुपये आपल्या बँक खात्यावर आल्याचे लक्षात आल्यावर वरगव्हाण येथील सरपंच भूषण पाटील यांनी संबंधित व्यापाऱ्याला त्यांचे तीन लाख रुपये परत केले. याबद्दल सरपंच पाटील यांचा जळगाव येथे राज्याचे ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहायक नवलसिंग राजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सभापती एम. व्ही. पाटील, जिल्हा बँकेचे माजी शाखा व्यवस्थापक डी. बी. पाटील, नारायण पाटील, तुषार पाटील आदी उपस्थित होते.

While congratulating Sarpanch Bhushan Patil for returning three lakh rupees to the account, Naval Singh Raje, M. V. Patil, D. B. Patil, Narayan Patil, Tushar Patil etc.
Jalgaon News : अमळनेर शहरात घरोघरी होणार सर्वेक्षण; प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्वेक्षण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.