Jalgaon Crime News : पारोळ्यात स्कूटीच्या डिक्कीतून शेतकऱ्याचे 3 लाख लंपास

Jalgaon Crime : स्टेट बँकेत वाघरे येथील शेतकऱ्याने ४ लाख ८० हजार रुपयांचे सोने गहाण ठेवून कर्ज घेतले.
Jalgaon Crime
Jalgaon Crimeesakal
Updated on

Jalgaon Crime News : येथील स्टेट बँकेत वाघरे येथील शेतकऱ्याने ४ लाख ८० हजार रुपयांचे सोने गहाण ठेवून कर्ज घेतले. त्यातील तीन लाख रुपये स्कूटीच्या डिक्कीत ठेवले होते. चोरट्याने पाळत ठेवून डिक्कीतून तीन लाख रुपये लंपास केले. गुरुवारी (ता. १८) दुपारी दोनच्या सुमारास वाघरे (ता. पारोळा) येथील शेतकरी प्रकाश पाटील यांनी शेतीसाठी सोने पारेळा स्टेट बँकेत गहाण ठेवूण ४ लाख ८० हजार रुपयांचे कर्ज काढले होते. (3 lakh stolen from farmers from trunk of scooty in Parola )

त्यातून १ लाख ८० हजारांची रक्कम आपल्याजवळ ठेवून उर्वरित रक्कम स्कूटीच्या (एमएच १९, डीवाय ०३९६) डिक्कीत ठेवली होती. स्टेट बँकेतून स्कूटीने व्यकटेशनगरमधील ते नातेवाइकाकडे कामानिमित्त गेले होते. स्कुटी अंगणात लावली. चोरट्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवली होती. चोरटे तेथून स्कूटी घेऊन पसार झाले.

Jalgaon Crime
Jalgaon Crime News : नंदगावात 2 गटांत घमासान; लोखंडी रॉड, दगडासह तुफान हाणामारी

चोरट्यांनी राणी लक्ष्मीबाईनगरमध्ये स्कूटीच्या डिक्कीतून तीन लाख रुपये काढले व स्कूटी त्याच ठिकाणी लाऊन पसार झाले. सर्व सीसीटीव्ही चेक केले असता, स्टेट बँक परिसरातूनच चोरटे वृद्ध दांपत्यावर पाळत ठेवून होते. वृद्ध ज्या ठिकाणी गेले, त्या सर्वत्र ठिकाणी अज्ञात तीन इसम त्यांच्या मागेच होते. पोलिसांसमोर चोरटे पकडण्याचे आव्हान आहे. याबाबत रात्री उशीरापर्यंत पारोळा पोलिसांत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Jalgaon Crime
Jalgaon Crime News : भुसावळमधील दुहेरी हत्याकांडातील आरोपींसह अन्य गुन्हेगारांवर ‘मोक्का’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.