Jalgaon News: वसतिगृहाची 30 टक्के शुल्कवाढ 15 टक्क्यांवर! NMU व्यवस्थापन परिषदेचा निर्णय; बृहत आराखडा शिफारसींनाही मान्यता

Jalgaon News : शैक्षणिक वर्ष २०२५-२६ या एका वर्षासाठी तयार करण्यात आलेल्या बृहत आराखड्यातील शिफारशींनाही व्यवस्थापन परिषद आणि त्यानंतर झालेल्या अधिसभेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
north maharashtra university
north maharashtra universityesakal
Updated on

Jalgaon News : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वसतिगृहासाठी सुचविलेली ३० टक्के शुल्कवाढ कमी करून १५ टक्के करण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ या एका वर्षासाठी तयार करण्यात आलेल्या बृहत आराखड्यातील शिफारशींनाही व्यवस्थापन परिषद आणि त्यानंतर झालेल्या अधिसभेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. (Jalgaon 30 percent increase in hostel fees to 15 percent NMU)

कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता. १९) व्यवस्थापन परिषदेची आणि त्यानंतर अधिसभेची बैठक झाली. २०२५-२६ या एका वर्षाचा विद्यापीठाचा बृहत आराखडा मान्य करून शासनाकडे सादर करण्यासाठी या बैठका घेण्यात आल्या.

व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत या बृहत आराखड्यावर चर्चा झाली. नवीन महाविद्यालयांसाठी स्थान निश्चित केलेले ५८ स्थळबिंदूसह अधिष्ठाता मंडळाने तयार केलेल्या बृहत आराखड्यात ज्या शिफारशी करण्यात आलेल्या आहेत. त्याला व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

शुल्कवाढ कमी

विद्यापीठ कॅम्पसवरील विद्यार्थी, विद्यार्थिंनींच्या वसतिगृह शुल्कात या शैक्षणिक वर्षापासून ३० टक्के दरवाढ करण्यात आली. वसतिगृह व्यवस्थापन समितीने केलेल्या शिफारशींच्या अनुषंगाने ही दरवाढ केली होती.

‘अभाविप’सह काही विद्यार्थी संघटनांनी ही शुल्कवाढ मागे घेण्याबाबत विद्यापीठ प्रशासनाकडे मागणी केली होती. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत या मागणीवर चर्चा झाली आणि ३० ऐवजी १५ टक्के शुल्कवाढीला व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली. (latest marathi news)

north maharashtra university
CM Majhi Ladki Bahin Yojana : जिल्ह्यात 2 लाख बहिणींचे अर्ज; केवळ 9 टक्के काम

यांची होती उपस्थिती

बैठकीस प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, राजेंद्र नन्नवरे, प्रा. अनिल डोंगरे, प्रा. साहेबराव भुकन, प्रा. म. सु. पगारे, प्राचार्य संजय सुराणा, प्रा. शिवाजी पाटील, प्रा. सुरेखा पालवे, नंदकुमार बेंडाळे, नितीन झाल्टे, प्रा. महेंद्र रघुवंशी, डॉ. पवित्रा पाटील, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, सीए रवींद्र पाटील, प्रा. योगेश पाटील उपस्थित होते.

बृहत आराखड्याला अधिसभेची मान्यता

व्यवस्थापन परिषदेने बृहत आराखड्याला मान्यता दिल्यानंतर अंतिम मंजुरीसाठी अधिसभेसमोर आराखडा मांडण्यात आला. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली अधिसभेची बैठक झाली. व्यवस्थापन परिषदेने केलेल्या शिफारशींसह या आराखड्याला अधिसभेने मान्यता दिली. या वेळी झालेल्या चर्चेत प्रा. एकनाथ नेहते, प्रा. धिरज वैष्णव, निशांत रंधे, डॉ. मंदा गावित, नितीन ठाकूर आदींनी भाग घेतला.

north maharashtra university
Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.