Free Textbooks Distribution Scheme : चोपडा तालुक्यात मोफत पाठ्यपुस्तक वाटप योजनेचा 36 हजार 100 विद्यार्थ्यांना लाभ!

Jalgaon News : आतापर्यंत चोपडा तालुक्यासाठी बालभारती नाशिक डेपोमधून १०० टक्के पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात आलेला आहे.
Textbooks
Textbooks esakal
Updated on

चोपडा : तालुक्यात २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात एकूण २४६ शाळांपैकी मराठी माध्यम अनुदानित २०३ शाळा व उर्दू माध्यम अनुदानित १८ शाळा अशा एकूण २२१ शाळांमधील ३६ हजार १०० विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वाटप योजनेचा लाभ मिळणार आहे. (jalgaon free textbook distribution scheme)

आतापर्यंत चोपडा तालुक्यासाठी बालभारती नाशिक डेपोमधून १०० टक्के पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात आलेला आहे. यावर्षी जवळपास तालुक्यातील ३६ हजार १०० विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचा लाभ होणार आहे. शाळा सुरू होण्याच्या सात दिवस अगोदर शाळास्तरापर्यंत पुस्तक पोहोचविण्यात येणार आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार आहे.

३१ मे २०२४पासून गटस्तरावरून केंद्र व शाळास्तरावर पुस्तके वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती गटाचे गटशिक्षणाधिकारी अविनाश पाटील यांनी दिली आहे. यावर्षी पाठ्यपुस्तकांचे काम गट समन्वयक नरेंद्र सोनवणे व प्रतिनिधी मिलिंद पाटील, प्रशांत सोनवणे, जीवनलाल वाडीले, सुनील मेश्राम, रविराज शिंदे या गटातील विषय साधन यांच्या समन्वयाने होणार आहे. (latest marathi news)

Textbooks
Bollywood Actor: माधुरीचा ड्रायव्हर म्हणून केलं काम, पहिल्याच चित्रपटात रेखासोबत इंटिमेट सीन, पण फ्लॉप अभिनेत्याचा लागला टॅग, पण आता...

गटस्तरावर प्राप्त झालेली पाठ्यपुस्तके पुढीलप्रमाणे

मराठी माध्यम

इयत्ता ---मराठी--सेमी --एकुण

१ ली -२०३२--१८००-३८३२

२ री- २३७१-१७५०-४१२१

३ री -१५३६--१५००--३०३६

४ थी -२५४५-१७००--४२४५

५ वी -२४६३-१८००--४२३६

६ वी.-३०६५-१६५०--४७१५

७ वी-२६९४-१६५०--४३४४

८ वी-२५५४-१६००--८३०८

उर्दू माध्यम

इयत्ता ---मराठी--सेमी --एकूण

१--३२३-४०--३६३

२--३८१-४०--४२१

३--४४२-४०--४८२

४--४४५-४०--४८५

५-४४२-००-४४२

६--४०४-००--४०४

७--४१६-००--४१६

८--३८६-००--३८६

Textbooks
Jalgaon News : ज्वारी खरेदीसाठी 450 शेतकऱ्यांची नोंदणी! गोदाम उपलब्ध नसल्याचा तहसीलदारांकडून खुलासा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.