Jalgaon News: वादळात एकाच कुटुंबातील 4 जणांचा बळी; सातपुड्यातील दुर्गम थोरपाणी आदिवासी वस्तीतील घटना, सुदैवाने मुलगा बचावला

Jalgaon News : यात अनेक गाव शिवारातील पिके जमीनदोस्त झाली असून, शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.
Crime News
Crime Newsesakal
Updated on

यावल : तालुक्यात रविवारी (ता. २६) सायंकाळी झालेल्या जोरदार वादळाने सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या थोरपाणी या आदिवासी वस्तीवरील नानसिंग गुला पावरा यांचे घर कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चौघांचा गुदमरून मृत्यू झाला. आठ वर्षांचा मुलगा मात्र सुदैवाने बचावला. तालुक्याला रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्याचा जोरदार फटका बसला. यात अनेक गाव शिवारातील पिके जमीनदोस्त झाली असून, शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. (Jalgaon 4 members of same family killed in storm)

तालुक्यात रविवारी सायंकाळी सोसाट्याचा वारा सुटल्याने नानसिंग गुला पावरा यांचे कुटुंब हे दरवाजा बंद करून घरात बसलेले होते. इतक्यात वादळामुळे त्यांचे घर कोसळल्यने नानसिंग, त्यांची पत्नी आणि तीन मुले असे एकूण पाच जण ढिगाऱ्याखाली अडकले. त्यांना श्वास घेण्यासाठी अडचणी आल्या.

यामुळे नानसिंग पावरा (वय २८), त्यांची पत्नी सोनूबाई पावरा (२२), मुलगा रतिलाल (३), मुलगी बालिबाई (२) गुदमरून जागीच ठार झाले. दरम्यान, खूप प्रयत्न करून या ढिगाऱ्याखालून याच कुटुंबातील शांतिलाल नानसिंग पावरा (८) हा बाहेर पडल्याने त्याचे प्राण वाचले.

त्याने बचावासाठी आरोळ्या मारून परिसरातील लोकांना बोलावल्यावर या दुर्घटनेची माहिती मिळाली. पावरा कुटुंबातील चौघे मृत झाले असले, तरी शांतिलाल हा मात्र सुदैवाने बचावला आहे. आयुष्याची दोरी बळकट असल्यानेच इतक्या भयंकर दुर्घटनेतून तो वाचल्याची भावना ग्रामस्थांनी बोलून दाखविली.

थोरपाणी येथील दुर्घटनेची माहिती मिळताच तहसीलदार मोहनमाला नाझरकर आणि पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह थोरपाणी या पाड्यावर धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत मृतदेह ढिगाऱ्याखालून काढून विच्छेदनासाठी यावल येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. (latest marathi news)

Crime News
Jalgaon Crime: चोपडा येथील माणक ज्वेलर्सची चौकशी! शहरात चर्चेला उधाण; चोरीचे सोनेप्रकरणी मेन रोडवरील व्यापाऱ्याची चौकशी

येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जावळे, डॉ. तुषार सोनवणे, डॉ. सौरव भुताणे यांनी विच्छेदन केले. मृतदेह नानसिंग पावरा यांच्या कुटुंबीयांना सोपविण्यात आले. चौघांवर शोकाकुल वातावरणात थोरपाणी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

माजी आमदारांकडून सांत्वन

घटनेची माहिती मिळताच चोपड्याचे माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी थेट यावल ग्रामीण रुग्णालय गाठले व येथे मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

कुटुंबास मदतीची अपेक्षा

नानसिंग पावरा हे गरीब कुटुंब असून, घर कोसळल्याने त्यांचा आठ वर्षांचा मुलगा वगळता संपूर्ण परिवार ठार झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आता मृतांचा वारसदार शांतिलाल पावरा याला शासकीय नियमानुसार भरीव मदत मिळावी, तसेच त्याच्या शिक्षणासह उपजीविकेची जबाबदारी शासनाने उचलावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Crime News
Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.