Jalgaon Crime : पारोळ्यात दगडफेक; 4 पोलिस जखमी, 24 जणांवर गुन्हा

Jalgaon Crime : ब्रह्मोत्सवाच्या पहिल्या वहनाच्या मिरवणुकीत वाहन ओढण्यावरून लहान मुलांच्या झालेल्या भांडणाचे पर्यवसान दगडफेकीत झाले.
Mahesh Patil of Secret Department injured in stone pelting.
Mahesh Patil of Secret Department injured in stone pelting.esakal
Updated on

पारोळा : येथे ब्रह्मोत्सवाच्या पहिल्या वहनाच्या मिरवणुकीत वाहन ओढण्यावरून लहान मुलांच्या झालेल्या भांडणाचे पर्यवसान दगडफेकीत झाले. बंदोबस्तासाठी असलेले शहरातील तीन, तर बाहेरगावच्या महिला पोलिस कर्मचारी जखमी झाल्या. ही घटना गुरुवारी (ता. ३) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. रात्री साडेबारापर्यंत पोलिसांनी हा वाद मिटविला. बुधवारी (ता. ३) रात्री साडेआठच्या सुमारास श्री बालाजी महाराजांचे पहिले वहन भवानीगड येथे आले असता, वाहन ओढण्यावरून अचानक एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. (4 policemen injured in stone pelting in Parole 24 people booked )

ही माहिती कळताच पोलिसांच्या गोपनीय शाखेचे महेश पाटील व किशोर भोई घटनास्थळी आले. घटना हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिस कार्यालयाशी संपर्क साधून मदत मागितली. दोन समाजांतील संघर्ष थांबविण्यासाठी पोलिसांनी विनंती केली. मात्र, दोन्हींनी काही एक न ऐकता दगडफेक सुरूच ठेवली. यात पोलिस कर्मचारी महेश पाटील यांच्या डाव्या कानाच्यावर डोक्यावर काठीसदृश वस्तू मारल्याने त्यांना जागेवरच भोवळ आली. पोलिस उपनिरीक्षक श्रीमती तिवारी यांनाही पायावर दगडाचा जबर मार लागल्याने पाय फ्रॅक्चर झाला.

त्यांच्यावर जळगावला, तर महेश पाटील यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दगडफेकीत गृहरक्षक दलाचे भटू पाटील व धोंडू लोंढे हेही जखमी झाले. दरम्यान, पोलिसांनी किशोर भोई यांच्या फिर्यादीवरून २४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आणखी काही संशयितांची ओळखपरेड सुरू असल्याने संशयितांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या १२ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Mahesh Patil of Secret Department injured in stone pelting.
Jalgaon Crime News : मुलाच्या हत्येप्रकरणी आरोपीला जन्मठेप! विखरण येथील महिलेची पुराव्याअभावी सुटका

चोपडा पोलिस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप पारोळ्‍यातच तळ ठोकून आहेत. दरम्यान, घटनास्थळी पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वरी रेड्डी, अपर अधीक्षक कविता नेरकर यांनी भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. बंदोबस्तासाठी अमळनेर, अमळगाव, धरणगाव येथील पोलिस अधिकारी व कर्मचारी, जळगाव येथील ‘एसआरपी’च्या दोन प्लाटून, पारोळ्याचे पोलिस निरीक्षक सुनील पवार व काही कर्मचारी तैनात आहेत.

अफवांवर विश्‍वास ठेवू नये

येथील श्री बालाजी यात्रेला ३७५ वर्षांची परंपरा असून, ही पारोळ्याच्या इतिहासातील दुर्दैवी घटना आहे. त्यामुळे गावाचा उत्सव शांततेत पार पडावा, यासाठी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, संयम बाळगून शांतता पाळावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Mahesh Patil of Secret Department injured in stone pelting.
Jalgaon Crime : दगडाने ठेचून तरुणाचा खून; अडावदला महिनाभरात तिसरी घटना; पोलिसांसमोर तपासाचे आव्हान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.