Jalgaon Crime : चोपड्यात 45 लाखांचा गांजा जप्त; ग्रामीण पोलिसांची कारवाई

Jalgaon Crime : ग्रामीण पोलिसांनी सातपुडा पर्वतरांगांमधील मालापूर शिवारातील शेतात छापा टाकून ४५ लाख रुपयांचा ७५० किलोग्रॅम गांजा जप्त केला.
Police with illegally planted ganja in a farm in Shiwar.
Police with illegally planted ganja in a farm in Shiwar.esakal
Updated on

चोपडा : ग्रामीण पोलिसांनी सातपुडा पर्वतरांगांमधील मालापूर शिवारातील शेतात रविवारी (ता. ६) छापा टाकून ४५ लाख रुपयांचा ७५० किलोग्रॅम गांजा जप्त केला. संशयित रुमल्या चेचऱ्या पावरा (रा. डॅडियापाडा, ता. चोपडा) फरारी झाला आहे. मालापूर शिवारात नाबार्डच्या कंपार्टमेंट २११ मधील शेतात गांजाची लागवड केल्याच्या माहितीवरून पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्यासह पथकाने छापा टाकला. (45 lakh ganja seized in Chopda action of rural police)

शेतात गांजाची शेती करीत असल्याचे दिसले. या कारवाईत ७५० किलोग्रॅमचा ओला गांजा आढळला. त्याची किंमत जवळपास ४५ लाख रुपये आहे. याबाबत हवालदार चेतन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रुमाल्या पावरा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी ही कारवाई केली. उपनिरीक्षक शेषराव नितनवरे, हवालदार गणेश पाटील तपास करीत आहेत.

Police with illegally planted ganja in a farm in Shiwar.
Jalgaon Crime : जनावरे लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; गुन्हे शाखेच्या पथकाकडून रोकडसह संशयितांना अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.