Jalgaon News : सौरउर्जा प्रकल्पासाठी 5 कोटी मंजूर करणार : पालकमंत्री पाटील यांची घोषणा; सफाई कामगारांना किमान वेतन लागू

Jalgaon News : नशिराबाद भुयारी गटार योजना अंतिम टप्प्यात असून, लवकरात लवकर त्यास मंजुरी मिळवून शहराच्या विकासाला गतिमान करण्यास प्राधान्य देणार आहे, अशी ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
Guardian Minister Gulabrao Patil speaking at the municipal council program.
Guardian Minister Gulabrao Patil speaking at the municipal council program.esakal
Updated on

नशिराबाद/जळगाव : नशिराबादसाठी पथदीप व पाणीपुरवठ्यासाठी विजेसाठी नवीन सोलर प्रकल्प उभारण्यासाठी तब्बल ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येणार आहे. नशिराबाद भुयारी गटार योजना अंतिम टप्प्यात असून, लवकरात लवकर त्यास मंजुरी मिळवून शहराच्या विकासाला गतिमान करण्यास प्राधान्य देणार आहे, अशी ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. (5 crores to be sanctioned for solar power project Guardian Minister Patil)

नगरपरिषदमार्फत दिव्यांग कल्याणकारी योजनेंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना निधी वाटपप्रसंगी बोलत होते. नशिराबाद नगरपरिषद झाल्यापासून सफाई कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायतीच्या दराप्रमाणे वेतन मिळत होते. सफाई कर्मचाऱ्यांचे वेतनवाढीबाबत बऱ्याच दिवसांपासून कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री पाटील व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन दिले होते.

पालकमंत्री पाटील यांनी निवेदनाची गांभीर्यपूर्वक दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी प्रसाद यांच्या निर्देशानुसार नशिराबादचे मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे नगरपरिषदेच्या ४२ सफाई कामगारांना किमान वेतनवाढ देणार आहेत. यामुळे नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी मंत्री पाटील यांचे आभार मानले. (latest marathi news)

Guardian Minister Gulabrao Patil speaking at the municipal council program.
Chowgaon Fort : पर्यटकांचे आकर्षण ठरतोय चौगावचा किल्ला! सातपुड्याच्या पायथ्यावरील त्रिवेणी, हिरवागार डोंगरही खुणावतोय सर्वांना

नगरपरिषदमार्फत दिव्यांग कल्याणकारी योजनेंतर्गत शहरातील ४०० दिव्यांग लाभार्थ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते निधी वाटप करण्यात आला. जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी सरपंच विकास पाटील, शिवसेनेचे शहरप्रमुख विकास धनगर, कीर्तीकांत चौबे, युवासेनेचे चेतन बऱ्हाटे, चंद्रकांत भोळे, प्रदीप साळी, चंद्रकांत भोळे, प्रकाश माळी, निळकंठ रोटे, किरण पाटील आदी उपस्थित होते. माजी सरपंच विकास पाटील यांनी प्रास्ताविक केले. बी. आर. खंदारे यांनी सूत्रसंचालन केले.

Guardian Minister Gulabrao Patil speaking at the municipal council program.
Jalgaon News : अखेर विद्यार्थिनींना फी माफीचा शासन आदेश निघाला! राष्ट्रवादी महिला शरदचंद्र पवार पक्षाच्या पाठपुराव्याला यश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com