Polling Station : अमळनेर विधानसभेसाठी 5 मतदान केंद्रे वाढणार!

Jalgaon News : विधानसभा मतदार संघातील पाच मतदान केंद्रात जास्तीचे मतदार झाल्याने नवीन पाच मतदान केंद्र वाढविण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे.
Polling Station
Polling Station esakal
Updated on

Jalgaon News : विधानसभा मतदार संघातील पाच मतदान केंद्रात जास्तीचे मतदार झाल्याने नवीन पाच मतदान केंद्र वाढविण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीची प्राथमिक तयारी सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी अमळनेर विधानसभा मतदार संघात ३२० मतदान केंद्रे होती. (5 polling stations will increase for Amalner Assembly)

मात्र काही मतदान केंद्रांवर मतदारांची संख्या अधिक झाल्याने पाच केंद्राचे विभाजन करून नवीन मतदान केंद्रे करण्यात येणार आहेत. शहरातील सानेगुरुजी माध्यमिक विद्यालयात असलेल्या १७४ क्रमांकाच्या मतदान केंद्रातील ६६५ ते १३८६ मतदारांचा १७५ मतदान केंद्रात समावेश करण्यात येणार आहे.

पैलाड भागातील १९७ मतदान केंद्रातील ७२३ मतदार नव्याने समाज मंदिर पैलड येथील १९८ मतदान केंद्रात समाविष्ट करण्यात येणार आहेत. सारबेटे बुद्रुक येथील नवीन वाढीव ११८ मतदार तसेच मतदार क्रमांक ७२१ ते १३६६ हे देखील नवीन मतदान केंद्र २४७ मध्ये समाविष्ट केले जाणार आहेत. (latest marathi news)

Polling Station
Jalgaon Monsoon Season : जिल्ह्यात रिपरिपने जनजीवन विस्कळित; आतापर्यंत 58 टक्के पाऊस

तसेच पारोळा तालुक्यातील शेळावे खुर्द येथील मतदान केंद्र ३०८ मधील मतदार क्रमांक ७२० ते १४५३ हे मतदान केंद्र क्रमांक ३०९ मध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे.

तर हिरापूर येथील ३१३ क्रमांकाच्या मतदान केंद्रातील मतदार क्रमांक ७५१ ते १४५१ मधील मतदार ३१४ क्रमांकाच्या मतदान केंद्रात समाविष्ट करण्यात येणार आहेत. उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी याबाबत प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे.

Polling Station
Jalgaon Dam Water Storage : अनेर धरणाचे सर्व दरवाजे उघडले! धरण 58 टक्के भरले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.