जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (ता. २५) जळगावला येत असून, त्यांच्या दौऱ्यानिमित्त जळगाव विमानतळ परिसरातील ५० किलोमीटर क्षेत्र ‘नो फ्लाईंग झोन’ घोषित करण्यात आले आहे. जळगाव विमानतळासमोरील इंडस्ट्रियल पार्कमध्ये रविवारी होणाऱ्या ‘लखपती दीदी’ या महिला संमेलनासाठी पंतप्रधान मोदी येत आहेत.
या भव्य कार्यक्रमासाठी राज्यभरातून सव्वा लाख महिला येण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर जळगाव विमानतळापासून ५० किलोमीटर परिघात जमिनीपासून ४ हजार फूट अंतरावर २२ ते २५ ऑगस्टपर्यंत ‘नो फ्लाइंग झोन’ म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आदेश काढले आहेत. (50 km area from airport No Flying Zone)