State Level Wrestling Tournament: अमळनेर येथे आजपासून राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा; जिल्ह्यांतील 500 खेळाडू सहभागी होणार

प्रताप महाविद्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज हॉलमध्ये शनिवारपासून (ता.२१) बारावी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा २०२४ ला सुरवात होत आहे.
State Level Wrestling Tournament: अमळनेर येथे आजपासून राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा; जिल्ह्यांतील 500 खेळाडू सहभागी होणार
Updated on

अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज हॉलमध्ये शनिवारपासून (ता.२१) बारावी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा २०२४ ला सुरवात होत आहे. या स्पर्धेचे उद्घाटन सकाळी अकराला होणार आहे. या स्पर्धेत राज्यातील विविध २० ते २५ जिल्ह्यातील चारशे ते पाचशे खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत बेल्ट रेसलिंग, मास रेसलिंग व पॅनक्रेशन या खेळांचा समावेश आहे. स्पर्धा कॅडेट, ज्युनिअर व सीनियर अशा सर्व वयोगटांतील महिला व पुरुष खेळाडूंसाठी खुल्या आहेत. (500 athletes from districts will participate in state level wrestling competition)

ही स्पर्धा महाराष्ट्राच्या संघाची निवड चाचणी म्हणून आयोजित करण्यात येत आहे. निवडलेला महाराष्ट्राचा संघ येत्या तीन ते सहा ऑक्टोबरदरम्यान देहरादून (उत्तराखंड) येथील मल्टीपर्पज हॉल, परेड ग्राउंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहे. याच राष्ट्रीय स्पर्धेतून बेल्ट रेसलिंग सीनियर वयोगटातील महिला व पुरुष खेळाडूंच्या एशियन बेल्ट रेसलिंग चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघाची निवड केली जाणार आहे. (latest marathi news)

State Level Wrestling Tournament: अमळनेर येथे आजपासून राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा; जिल्ह्यांतील 500 खेळाडू सहभागी होणार
National Wrestling Competition : राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा आता २८ पासून ; हंगामी समितीचा निर्णय,तयारी नसल्याचे कारण

एशियन बेल्ट रेसलिंग चॅम्पियनशिप १८ ते २४ नोव्हेंबरदरम्यान कोहिमा, नागालँड येथे नागालँड सरकार व ऑल इंडिया ट्रॅडिशनल रेसलिंग अँड पॅनक्रेशन फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत भारतीय महिला व पुरुष संघ सहभागी होणार आहे.

ज्युनिअर वयोगटातील खेळाडूंसाठी उझबेकिस्तान, नुकूस येथे होणाऱ्या एशियन चॅम्पियनशिपसाठी मुला-मुलींचा संघ निवडला जाणार आहे. सर्व क्रीडा रसिक, खेळाडू, क्रीडा संघटकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राज्यस्तरीय ट्रेडिशनल रेसलिंग असोसिएशनचे अध्यक्ष सी. ए. तांबोळी व जिल्हा सचिव सचिन वाघ यांनी केले आहे.

State Level Wrestling Tournament: अमळनेर येथे आजपासून राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा; जिल्ह्यांतील 500 खेळाडू सहभागी होणार
Wrestling : घुमणाऱ्या आखाड्यात ‘मॅट’वरील डावपेचही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.