चोपडा : तालुक्यातील सातही मंडळांमधील ३१ हजार ५२६ शेतकऱ्यांना ५१ कोटी २१ लाख एवढा पीकविमा मंजूर झाला असून, शासनाकडील हिस्सा कंपनीकडे जमा झाल्यानंतर रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे विम्याचे पैसे जमा होणार आहेत. यासाठी आमदार लता सोनवणे यांनी पाठपुरावा केला होता. (Jalgaon 51 crore approved for crop insurance in Chopada taluka 31 thousand farmers benefited)
तालुक्यातील सातही महसूल मंडळातील कापूस पिकासाठी एकूण ३१ हजार ५२६ शेतकऱ्यांनी एक रुपयात पीकविमा काढलेला होता.
या शेतकऱ्यांसाठी २०२३-२०२४ मध्ये आमदार लता सोनवणे व माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचा पाठपुरावा व प्रयत्नांमुळे दुष्काळसदृश परिस्थिती तालुक्यांत जाहीर झाली होती. त्यामुळे उत्पादनात घट झाल्याने शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. (latest marathi news)
या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी म्हणून सतत पाठपुरावा करीत आमदार लता सोनवणे यांनी त्याबाबत वस्तुनिष्ठ अहवाल शासनास सादर करण्यासाठी तहसीलदार भाऊसाहेब थोरात.
तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे, गटविकास अधिकारी आर. ओ. वाघ यांना सूचना केल्या होत्या. त्यामुळे अखेर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.