PM Crop Insurance Yojana : साडेतीन लाख विमाधारकांसाठी 523 कोटी! प्रधानमंत्री पीकविमा योजना

Jalgaon News : प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत खरीप पिकांच्या उत्पन्नावर आधारित जिल्ह्यातील ४ लाख ५६ हजार १२८ शेतकऱ्यांनी विमा उतरविला होता.
PM Crop Insurance Yojana
PM Crop Insurance Yojana esakal
Updated on

जळगाव : प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत खरीप पिकांच्या उत्पन्नावर आधारित जिल्ह्यातील ४ लाख ५६ हजार १२८ शेतकऱ्यांनी विमा उतरविला होता. विमाधारक शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांच्यासह जिल्ह्यातील आमदारांनी जिल्हाधिकारी व कृषी विभागासोबत वेळोवेळी बैठका घेऊन विमा कंपनीला निर्देश दिले होते. (PM Crop Insurance Yojana)

त्यानुसार विमा कंपनीने ३ लाख ८७ हजार ९७३ शेतकरी पात्र केले. त्यासाठी ओरिएंटल इंहिया इंन्सुरन्स कंपनीमार्फत ५२३ कोटी २८ लाखांच्या निधीस कंपनीने मान्यता दिली आहे. याबाबत मंगळवारी (ता. २३) झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत ही रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात थेट जमा करण्यासाठी शासनाने विमा कंपनीकडे मागणी केली. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

तालुकानिहाय मंजूर शेतकरी संख्या व त्याची रक्कम

तालुका--शेतकरी-- रक्कम

अमळनेर--५५ हजार ८२४--३६ कोटी १० लाख

भडगाव--२३ हजार ७७१--११ कोटी ८४ लाख

भुसावळ--८ हजार ४७६-- ७ कोटी ५५ लाख

बोदवड--१२ हजार ९५९--१७ कोटी ८४ लाख

चाळीसगाव--५७ हजार ५८९--११२ कोटी

चोपडा--३१ हजार ५२६--५१ कोटी २१ लाख

वरणगाव--१० हजार ५३३--४७ कोटी ९५ लाख

एरंडोल--२३ हजार ६७६--१५ कोटी २१ लाख

जळगाव--१२ हजार ५५८-४ कोटी ९० लाख

जामनेर--५७ हजार ९६४ --१४ कोटी ४ लाख (latest marathi news)

PM Crop Insurance Yojana
Jalgaon Rain Damage Crop : ‘ती’ 69 गावे भरपाईच्या प्रतीक्षेत! पारोळा तालुक्यातील नुकसानग्रस्तांची प्रशासनाला आर्त हाक

मुक्ताईनगर--२ हजार-- ९ लाख ५१ हजार

पाचोरा--४६ हजार ११६- ९३ कोटी ५८ लाख

पारोळा--४० हजार ४० --२० कोटी ९४ लाख

रावेर--८९०- ५० लाख ८७ हजार

यावल--७ हजार ५१-५ कोटी ९१ लाख

एकूण--३ लाख ८७ हजार--५२३ कोटी २८ लाख ५ हजार ३८९

यंदा विमाधारक शेतकऱ्यांना मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती अग्रीम जिल्ह्यात ८२ कोटी ५२ लाख वितरित झाला आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्ती खरीप हंगाम २०२३ साठी जिल्ह्यातील पात्र विमाधारक शेतकऱ्यांना ५० कोटी ११ लाख रुपये वितरित झाले आहेत. उत्पन्नावर आधारित खरीप हंगाम २०२३ साठी नुकतीच मंजूर झालेली ५२३ कोटी रक्कम कंपनीमार्फत वर्ग करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

‘प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा लाभ घ्या’

प्रधानमंत्री पीकविमा योजना कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक असली, तरी विमा हप्ता नाममात्र एक रुपया असल्याने सर्व शेतकऱ्यांनी खरीप हंगाम २०२४ साठी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

PM Crop Insurance Yojana
Jalgaon Banana News : केळीचे भाव लिलाव पद्धतीने जाहीर करण्यासाठी 30 ला बैठक!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.