Jalgaon Unseasonal Rain Damage : चाळीसगाव तालुक्यातील 63 गावांमध्ये नुकसान

Jalgaon Unseasonal Rain Damage : तालुक्यात सलग दोन दिवस झालेल्या वादळी पावसासह गारपिटीमुळे तालुक्यात एकूण ६३ गावांना फटका बसला आहे.
Jalgaon Unseasonal Rain Damage (file photo)
Jalgaon Unseasonal Rain Damage (file photo)esakal
Updated on

Jalgaon Unseasonal Rain Damage : तालुक्यात सलग दोन दिवस झालेल्या वादळी पावसासह गारपिटीमुळे तालुक्यात एकूण ६३ गावांना फटका बसला आहे. या गावातील ८ हजार २१२ शेतकऱ्यांचे ५ हजार ५६५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे, अशी माहिती बुधवारी प्रशासकीय सूत्रांकडून देण्यात आली.

दरम्यान, तिसऱ्या दिवशीही लोंढे परिसरातील काही भागात पुन्हा वादळी पावसाने हजेरी लावली. (Jalgaon 63 villages were affected in taluka due to two days of stormy rain and hailstorm)

तालुक्यातील मेहुणबारेसह लोंढे, कृष्णापुरी, चिंचगव्हाण, दहिवद, धामणगाव, देशमुखवाडी, आडगाव, चिंचखेडे, सेवानगर, मांदुर्णे, उपखेड, पिलखोड, तामसवाडी, विसापूर, रामनगर, दरेगाव, खडकीसीम, पळासरे, कडरे तिरपोळे, वरखेडे बुद्रूक, वरखेडे खुर्द, पिंपळवाड म्हाळसा, जावळे, जामडी, वाघले, कोंगानगर.

तळोदे प्र. चा., रोकडे गावांना मंगळवारी (ता.२७) वादळी पाऊस झाला. ज्यामुळे १ हजार ९७२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून २ हजार ५६० शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. यात वरखेडे गावात केळीचे सर्वाधिक नुकसान झाले. आज सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन नुकसानाची पाहणी केली.

या संकटामुळे अगोदरच कमी पावसामुळे कसाबसा घेतलेला खरीप हंगाम पुरता वाया गेला होता. खरिपाची भर रब्बीत निघेल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र, या अवकाळीने आशेची निराशा केली आहे. रब्बीची पिके जमीनदोस्त झाल्याने सर्वत्र प्रचंड नुकसान झाले आहे. (latest marathi news)

Jalgaon Unseasonal Rain Damage (file photo)
Jalgaon News : भुसावळ विभागातील स्थानकांचा होणार पुनर्विकास

तिसऱ्या दिवशी चक्रीवादळ

सलग दोन दिवसांपासून अवकाळी पावसामुळे शेतकरी हतबल झालेला असताना बुधवारी (ता. २८) तिसऱ्या दिवशीही सायंकाळी दरेगाव, लोंढे, विसापूर, रामनगर, पिंजारपांडे भागात सुमारे २० ते २५ मिनिटे चक्रीवादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घासच हिरावला गेला आहे.

प्रशासनाकडून पाहणी

नुकसानग्रस्त भागाची मेहुणबारे भागाचे मंडलाधिकारी सुनील पवार, लोंढेचे तलाठी अनिल निकम, वरखेडेचे तलाठी पवन शेलार, खडकीच्या तलाठी विश्रांती भोसले यांनी प्रत्यक्ष शेतशिवार फिरून पाहणी केली. केळी, मका, ज्वारी व इतर फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे त्यांनी सुरु केले आहेत.

Jalgaon Unseasonal Rain Damage (file photo)
Jalgaon News : महापालिकेच्या ‘आपला दवाखाना’साठी डॉक्टरांच्या 20 जागासाठी 42 उमेदवार पात्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.