Jalgaon News : उमरदेत 7 एकर मका रानडुकरांनी केला उद्ध्वस्त

Jalgaon : तालुक्यातील पद्मालय शिवारातील उमरदे येथील सात एकरातील शेतात पंधरा दिवसांपूर्वी पेरणी केलेल्या मक्याचे पीक रानडुकरांनी उद्ध्वस्त केल्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
Maize crop destroyed by wild boars at Umarde in Shiwar.
Maize crop destroyed by wild boars at Umarde in Shiwar.esakal
Updated on

Jalgaon News : तालुक्यातील पद्मालय शिवारातील उमरदे येथील सात एकरातील शेतात पंधरा दिवसांपूर्वी पेरणी केलेल्या मक्याचे पीक रानडुकरांनी उद्ध्वस्त केल्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. वन विभागाने नुकसानीचा पंचनामा करून मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. येथील प्रगतिशील शेतकरी तथा माजी उपनगराध्यक्ष संजय खंडू महाजन व मालती सुभाष महाजन यांचे पद्मालय शिवारातील उमरदे येथे शेती आहे. ( 7 acres of maize destroyed by wild boars in Market )

संजय महाजन व मालती महाजन यांनी पंधरा दिवसांपूर्वी सात एकर क्षेत्रात मक्याची पेरणी केली होती. मंगळवारी पहाटेच्या सुमारास रानडुकरांनी महाजन यांच्या शेतातील पेरणी केलेले मक्याचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त केल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. संजय महाजन यांनी रानडुकरांनी केलेल्या नुकसानीची माहिती वन खात्याच्या अधिकाऱ्यांना दिली. याबाबत वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घेऊन झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी संजय महाजन व मालती महाजन यांनी केली आहे. (latest marathi news)

Maize crop destroyed by wild boars at Umarde in Shiwar.
Jalgaon News: आधुनिक सावित्रीने दिले पतीला जीवदान! अमळनेेरच्या गिरीश पाटील यांच्यावर यशस्वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

दरम्यान, पद्मालय शिवारात यापूर्वी देखील वन्यप्राण्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान केले असल्यामुळे वन विभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. जंगलात रानडुकरांची संख्या जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पद्मालय शिवारात घनदाट जंगल असल्यामुळे रानडुकरांसह अन्य वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

Maize crop destroyed by wild boars at Umarde in Shiwar.
Jalgaon News : शिरूड येथील युवकाने उचलले टोकाचे पाऊल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.