Jalgaon News : विनातिकीट प्रवाशांकडून साडेसात लाख दंड वसूल

Jalgaon News : विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्थानकांवर तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली.
Officers and staff during the expedition.
Officers and staff during the expedition.esakal
Updated on

भुसावळ : भुसावळ विभागात विनातिकीट व अवैध प्रवासाला आळा घालण्यासाठी मेल एक्स्प्रेस, पॅसेंजर आणि विशेष गाड्यांमध्ये तिकीट तपासणी मोहीम सुरू आहे. त्यात गेल्या दोन दिवसांत सात लाख ५४ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. सोबत १५ अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. धूम्रपान करणाऱ्या १२१ प्रवाशांना ३९ हजार २५० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. (Jalgaon fine collected from ticketless passengers)

Officers and staff during the expedition.
Akola and Buldhana Lok Sabha Election : विजयाची माळ माझ्याच गळ्यात! उमेदवारांनी केला विजयाचा दावा

विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार व सहायक वाणिज्य व्यवस्थापक (तिकीट तपासणी) पी. के. सिंग यांच्या नेतृत्वात विविध स्थानकांवर तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली.

त्यात ३० व ३१ मे रोजी १,२८५ प्रवाशांकडून सात लाख सहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. शिवाय धूम्रपान करणाऱ्या १२१ प्रवाशांना ३९ हजार २५० रुपयांचा दंड ठोठावला. असा एकूण एक हजार ४७२ प्रकरणांतून सात लाख ५४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. १५ अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. (latest marathi news)

Officers and staff during the expedition.
Free Textbooks Distribution Scheme : चोपडा तालुक्यात मोफत पाठ्यपुस्तक वाटप योजनेचा 36 हजार 100 विद्यार्थ्यांना लाभ!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.