भडगाव : गिरणा पट्ट्यासाठी वरदान ठरणारा नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पास राज्यपालांच्या मंजुरीनंतर आज (ता.२५) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ७ हजार १५ कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे लवकरच प्रशासकीय मान्यता मिळून कामाची निविदा निघण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या योजनेमुळे पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे ३०१ दलघमी म्हणजे १०.६४ टीएमसी पाणी गिरणा खोऱ्यात येऊन तब्बल ५० हजार हेक्टर जमिन ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे. (7 thousand crore tender of Nar Par approved)