Jalgaon Road Damage : निकृष्ट कामामुळेच 70 कोटींचा महामार्ग खड्ड्यात! वारंवार दुरुस्तीनंतरही ‘जैसे थे’

Jalgaon News : शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर झाले. मात्र, ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे व दोषपूर्ण झाल्याने अगदी दोनच वर्षांत रस्त्याची पूर्ण वाट लागली आहे.
Potholes at Akashwani Chowk on the highway passing through Jalgaon city.
Potholes at Akashwani Chowk on the highway passing through Jalgaon city.esakal
Updated on

Jalgaon News : शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर झाले. मात्र, ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे व दोषपूर्ण झाल्याने अगदी दोनच वर्षांत रस्त्याची पूर्ण वाट लागली आहे. वारंवार दुरुस्ती करूनही महामार्गावरील खड्ड्यांची ठीगळं भरून निघत नाहीत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची सुरवातीपासूनच्या उदासीनतेमुळे मक्तेदारानेही ‘हात वर’ केले असून, ७० कोटींचा हा रस्ता अक्षरश: खड्ड्यात गेला आहे. (Jalgaon Road Damage)

जळगाव शहरातून गेलेल्या पूर्वाश्रमीच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चौपदरीकरण निश्‍चित झाल्यानंतर हा रस्ता पाळधीपासून तरसोदपर्यंत बायपास काढण्यात आला. चौपदरीकरणात तो महामार्ग क्रमांक ५३ झाला. बायपासमुळे जळगाव शहरातून गेलेल्या महामार्गाच्या भवितव्यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले. मात्र, २०१६ मध्ये विशेष बाब म्हणून शहरातील महामार्गाचे चौपदरीकरण मंजूर होऊन प्रत्यक्ष कामास २०२० ला सुरवात झाली. कोरोनामुळे काम काही महिने रखडल्यानंतर २०२१ ला ते कसेबसे पूर्ण झाले.

तांत्रिकदृष्ट्या सदोष काम

जळगाव शहरातून खरेतर थेट बांभोरीच्या गिरणा नदीवरील पुलापासून थेट तरसोद फाट्यापर्यंत महामार्गावर उड्डाणपूलच (फ्लाय ओव्हर) हवा होता. किंबहुना पाळधी ते तरसोद असाच हा पूल हवा होता. मात्र, केवळ खोटेनगर ते कालिंकामाता चौकापर्यंतचे अवघ्या ७ किलोमीटर टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम याद्वारे करण्यात आले. कामाची सुरवात झाली.

तेव्हापासूनच या कामावर अनेक तज्ज्ञांनी आक्षेप घेतले. रस्त्यावरील भुयारी मार्ग (अंडरपास), आकाशवाणी चौकासह इच्छादेवी व अजिंठा चौकातील सर्कल, भुयारी मार्गांलगतचे सेवा रस्ते हे सारे कामच तांत्रिकदृष्ट्या दोषपूर्ण असल्याचा दावा आजही तज्ज्ञ करीत आहेत. त्यामुळेच भुयारी मार्गांमध्ये, तसेच सेवा रस्त्यांवर व उड्डाणपुलांवर बऱ्याच ठिकाणी पावसाचे साचत असल्याचे चित्र दिसते. (latest marathi news)

Potholes at Akashwani Chowk on the highway passing through Jalgaon city.
Jalgaon News : सार्वजनिक सुविधांपासून सावखेडे तुर्क गाव वंचित : सुनील रामोशी

कामाच्या दर्जावर प्रश्‍नचिन्ह

या कामाचे कंत्राट जांडू कन्स्ट्रक्शनला दिले होते. या मक्तेदार कंपनीने कामाचा दर्जाच राखला नाही. काम पूर्ण झाल्यानंतर अवघ्या वर्षभरात व पहिल्याच पावसात या महामार्गाच्या झालेल्या दुरवस्थेने काम किती निकृष्ट दर्जाचे होते, हे अधोरेखित केले. या रस्त्यावर जिल्हा उद्योग केंद्रासमोर, आयटीआयसमोर सुरवातीपासूनच खड्डे पडत आहेत.

त्याठिकाणी मार्गही खचत आहे. अनेकदा दुरुस्ती करूनही त्याच-त्याच ठिकाणी खड्डे पडत आहेत. अग्रवाल हॉस्पिटल चौक ते आकाशवाणी चौकादरम्यान, तसेच दादावाडीसमोरील उड्डाणपुलावरही खड्डे आहेत. आकाशवाणी, इच्छादेवी, अजिंठा चौकातील सर्कलची दुरवस्था लपून राहिलेली नाही.

मक्तेदार एजन्सीवर कृपादृष्टी

शहरातील वाढती वाहतूक, अवजड वाहनांची वर्दळीमुळे वाढलेल्या अपघातांमुळे खरेतर या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले. मात्र, हा महामार्ग सुविधेपेक्षाही धोकादायकच अधिक बनला आहे. जेव्हा या रस्त्याचे काम सुरू झाले, तेव्हापासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची मक्तेदार एजन्सीवर कृपादृष्टी आहे. निकृष्ट व तांत्रिकदृष्ट्या दोषपूर्ण काम असूनही एजन्सीला सूचना देण्यात आल्या नाहीत. त्यामुळेच या रस्त्याची वारंवार दुरुस्ती करूनही तो दुरुस्त होताना दिसत नाही.

Potholes at Akashwani Chowk on the highway passing through Jalgaon city.
Jalgaon Municipality News : महापालिका कर्मचाऱ्यांना मिळणार कालबद्ध पदोन्नती; शुक्रवारपर्यंत कागदपत्रे सादर करण्याचे आदेश

तात्पुरत्या ठिगळांनी भागतेय काम

थोडाफार पाऊस आला तरी महामार्गाची वाट लागते. माध्यमांमधून वृत्त झळकले, नागरिक संतप्त झाले, आंदोलनाचा पवित्रा घेतला की मग.. महामार्ग प्राधिकरणाला जाग येते. नंतर ते मक्तेदार कंपनीला सूचना देतात व तात्पुरत्या मलमपट्टीचा देखावा केला जातो. खड्डे कसेतरी बुजल्यानंतर पुन्हा पाऊस झाल्यास पुन्हा तेच खड्डे अधिक मोठे होऊन अपघातास निमंत्रण देतात..

आकाशवाणी चौकाची लाज वाटते

आकाशवाणी चौक सर्वाधिक वर्दळीचा आहे. याच चौकातून रोज जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, अप्पर जिल्हाधिकारी, अप्पर पोलिस अधीक्षक, न्यायाधीश, जिल्हा परिषद सीईओ यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधींचा सातत्याने वावर असतो. मात्र, सदोष व अभियांत्रिकीची थट्टा उडविणारे सर्कल, सर्कलसभोवतालच्या रस्त्याची झालेली चाळण पाहून जळगावकर म्हणून अक्षरश: लाज वाटावी, असे इथले चित्र आहे.

मंत्र्यांचे व्हीजन काय आणि या रस्त्याची अवस्था काय?

रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या दहा वर्षांत देशभरातील महामार्गांचे चित्रच बदलून टाकले. ‘रोडकरी’ म्हणून लौकिक प्राप्त केलेल्या गडकरींचे एकूणच दळणवळणाच्या सुविधांबद्दल अत्यंत उच्च दर्जाचे व्हीजन आहे. असे असताना या रस्त्याची अवस्था पाहून गडकरींना किती दु:ख होत असेलल असा प्रश्‍न पडावा. महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना या रस्त्याच्या अवस्थेबद्दल त्यांच्या खात्याच्या मंत्र्यांना छायाचित्र, व्हिडिओसह माहिती द्यावी, अशी अपेक्षा आहे.

Potholes at Akashwani Chowk on the highway passing through Jalgaon city.
Jalgaon Banana News : केळीचे भाव लिलाव पद्धतीने जाहीर करण्यासाठी 30 ला बैठक!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.