National Lok Adalat : येथील न्यायालयात शनिवारी (ता. २७) राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकदालतीचे पॅनलप्रमुख न्यायाधीश एम. एस. काझी तर पंच म्हणून ॲड. व्ही. डी. महाजन यांनी काम पाहिले. लोकअदालतीत न्यायालयात दाखल तसेच दाखलपूर्व अशी एकूण १ हजार १२४ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ७१ प्रकरणे निकाली निघून त्यात एकूण ३८ लाख ६४ हजार ९८८ रुपये वसूल झाले. (71 cases settled in National Lok Adalat compromise in old claims )
न्यायालयात दाखल दिवाणी २७ प्रकरणे होती. त्यापैकी ४ प्रकरणे निकाली निघून ११ लाख १७ हजार ९७२ रुपये तडजोडीअंती वसूल झाले. फौजदारी ९९ प्रकरणे ठेवली होती. त्यापैकी ४६ प्रकरणे निकाली निघून १ लाख २७ हजार २४८ रुपये तडजोडीअंती वसूल झाले, असे एकूण १२६ पैकी ५० प्रकरणे निकाली निघून १२ लाख ४५ हजार २२० रुपये तडजोडीअंती वसूल झाले. या लोकअदालतीत बँक ऑफ बडोदा, स्टेट बॅंक, सेंट्रल बँक, बॅंक ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र ग्रामीण बँक, आयडीबीआय बॅंक, बीएसएनएल व नगरपरिषद, पारोळा या विभागांनी देखील आपली दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली होती. (latest marathi news)
या दाखल पूर्व ९९८ प्रकरणांत २१ प्रकरणे निकाली निघून त्यात २६ लाख १९ हजार ७६८ रुपये तडजोडीअंती वसूल झाले आहेत. तसेच जुना २०१३ चा प्रलंबित असलेला सुनीता दत्तात्रय पाटील वि. वेणुबाई गुलाबराव पाटील यांचा दिवाणी दावा तडजोडीचे निकाली काढण्यात आला. तसेच २०२३ चे कौटुंबिक हिंसाचाराचे हिनाबानो मोनिस वि. मोनीस इकबाल खाटीक यांच्या प्रकरणात तडजोड घडवून नांदण्यास पाठविण्यात आले. या वेळी ज्येष्ठ विधिज्ञ अनिलकुमार देशपांडे, ए. आर.
बागूल, आनंदराव पवार, ॲड. ए. डी. पाटील, दत्ताजी महाजन, ए. डी. कश्यप, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. प्रशांत ठाकरे, सचिव ॲड. गणेश मरसाळे, ॲड. तुषार पाटील, वाय. एन. मोरे, तुषार के. पाटील, सतीश पाटील, भूषण माने, एच. एम. कुलकर्णी, अकील पिंजारी, वेदव्रत काटे, सतीश पाटील, कृत्तिका आफ्रे, स्वाती शिंदे, वि़द्या सूर्यवंशी, पूनम पाटील, गौरी कासार, ज्ञानेश्वर पाटील, ॲड. हर्षल शर्मा व वकील संघाचे सदस्य, सरकारी अभियोक्ता मगर, पोलिस निरीक्षक सुनील पवार, पालिका मुख्याधिकारी किशोर चव्हाण व कर्मचारी आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.